Sunday, April 20, 2025
Home बॉलीवूड अतिशय कमी वयात ‘या’ सुपरस्टार कलाकारांच्या मुलांनी घेतला जगाचा निरोप

अतिशय कमी वयात ‘या’ सुपरस्टार कलाकारांच्या मुलांनी घेतला जगाचा निरोप

मनोरंजनविश्वात काम करणारे कलाकार नेहमीच त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना हसवतात, रडवतात विचार करायला भाग पडतात. नेहमीच कलाकारांचे लाईफ त्यांचे चैनीचे जीवन प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत असतात. त्यांचं छानछोक जीवन सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय असतो. मात्र कलाकारांच्या मेकअपच्या मागे आणि त्यांच्या हसूच्या मागे एक दुःख असते. मात्र ते जगासमोर नेहमी हसत वावरतात आणि आपले मनोरंजन करतात. कलाकरांना त्यांच्या खासगी आयुष्यात नेहमीच अशा काही घटनांचा सामना करावा लागतो, ज्या त्यांच्या संपूर्ण कामावर आणि आयुष्यावर परिणाम करतात. आज या लेखातून आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या मुलांना गमवण्याचे दुःख पचवले आहे.

गोविंदा :
बॉलिवूडचा हिरो नं १ म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता म्हणून गोविंदा ओळखला जातो. आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कॉमेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदाने देखील मुलं गमवण्याचे दुःख सहन केले आहे. गोविंदाच्या चार वर्षाच्या मुलीचे आकस्मिक निधन झाले होते. ती वेळेच्या आधीच जन्माला आली होती आणि काही काळाने तिचे निधन झाले. आता तो यशवर्धन आणि टिना या दोन मुलांचा बाबा आहे.

जगजीत सिंग :
प्रसिद्ध गझल गायक असणाऱ्या जगजीत सिंग यांच्या १८ वर्षाच्या मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला होता. १९९० साली त्यांनी त्यांच्या मुलाला गमावले. त्यानंतर जगजीत सिंग आणि चित्रा यांनी गायनातून ब्रेक घेतला. पुढे एक वर्षाने जगजीत सिंग यांनी पुन्हा गाण्यास सुरुवात केली मात्र चित्रा आल्या नाही.

 

कबीर बेदी :
दिग्गज अभिनेता असलेल्या कबीर बेदी यांनी चार लग्न केले आणि ते दोन मुलांचे पिता बनले. मात्र त्यांच्या सिद्धार्थ नावाचा एक मुलगा सिजोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त होता यातच त्याने वयाच्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली. कबीर यांनी त्यांच्या मुलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

शेखर सुमन :
१९८३ साली अभिनेता, सूत्रसंचालक, निर्माता, गायक असणाऱ्या शेखर सुमन यांनी अलका यांच्याशी लग्न केले. त्यांना आयुष्य आणि अध्ययन अशी दोन मुलं झाली. मात्र आयुषने केवळ ११ व्या वर्षी हृदयाच्या आजारामुळे या जगाचा निरोप घेतला. आता अध्ययन सुमन आता बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून स्थापन होत आहे.

प्रकाश राज :
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठे नाव असणारे अभिनेते प्रकाश राज यांनी देखील पुत्रशोक अनुभवला आहे. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा गच्चीवर पतंग उडवताना तोल जाऊन खाली पडला आणि त्यातच त्याचे निधन झाले.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा