हरभजन सिंगने आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत केली मोठी घोषणा; ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार काम, शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर

Indian Cricketer Harbhajan Singh Shares Special Glimpse of Debut Tamil Movie Friendship Fans Super Excited South Bhojpuri Mogi


भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगची गणना दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. मैदानावर भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा हरभजन आपल्या रोखठोक मतांसाठीही ओळखला जातो. तो अनेक विषयांवर आपले मत मांडताना दिसतो. अशातच त्याने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. खरं तर हरभजन सिंग चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. तो आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्याने यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

हरभजन आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आगामी ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हरभजन खूपच कूल अंदाजात दिसत आहे. ‘फ्रेंडशिप’मार्फत तमिळ चित्रपटात पदार्पण करण्याबाबतची हरभजनची उत्सुकता कमालीची आहे. तो सातत्याने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना याबद्दल सांगत आहे.

त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर सांगितले की, “‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे आणि शूटिंग सुरू आहे. लवकरच मी चित्रपटगृहाच्या मैदानावर नव्या अंदाजात तुम्हाला भेटेल.” या फोटोसोबतच त्याने हिंट दिली आहे की, चित्रपट उन्हाळ्यात रिलीझ होईल. सध्या फ्रेंडशिप चित्रपट रिलीझ करण्याची तारीख जाहीर केली नाही, परंतु हरभजनच्या ट्वीटवरून स्पष्ट होते की, चित्रपट उन्हाळ्यात चित्रपटगृहांमध्ये येऊ शकतो.

या फोटोंमध्ये हरभजन सिंगसोबत अभिनेत्री लोसलिया मारियानेसनही दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्रीने पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे, तर हरभजनने तमिळचे पारंपारिक वस्त्र म्हणजेच लुंगी आणि निळा शर्ट घातला आहे. सोबतच चित्रपटात काम करणारे इतर कलाकारही दिसत आहेत.

अभिनेत्रीविषयी थोडंस…
विशेष म्हणजे हरभजन सिंगसोबतच लोसलियाचाही हा पहिलाच सिनेमा आहे. २४ वर्षीय लोसलिया अभिनय क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात रिपोर्टिंग आणि न्यूज एँकरिंगने केली होती. यासोबतच ती मॉडेलिंगही करते. लोसलियाचा जन्म श्रीलंकेत झाला होता. असे असले तरीही तिचे वडील कॅनडामध्ये राहतात.

बिग बॉसमध्ये एंट्री केल्यानंतरच तिला एक नवीन ओळख मिळाली. ती खूपच सुंदर दिसत असून तिला सोशल मीडियावर जबरदस्त चाहतावर्ग लाभला आहे. ती आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात न दिसूनही तिला इंस्टाग्रामवर १ मिलियनपेक्षा अधिक लोक फॉलो करतात. हरभजन सिंगसोबत फोटोमध्ये दिसल्यानंतर तिच्या फॉलोवर्समध्ये भलतीच वाढ झाली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सूर्या हे करत आहेत. आतापर्यंत हरभजन सिंगने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे, परंतु कोणत्याही चित्रपटात हीरोच्या भूमिकेत दिसण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. हरभजनच्या चाहत्यांना त्याच्या ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट तमिळव्यतिरिक्त हिंदी आणि पंजाबी भाषेतही डब केली जाईल.


Leave A Reply

Your email address will not be published.