गुरुवार (५ ऑगस्ट) भारतासाठी खूप मोठा दिवस होता, किंबहुना आहे. आजची सकाळ भारतासाठी सुखद आणि अविस्मरणीय ठरली. सध्या टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने तीन पदकांची कमाई केली होती. आता यात अजून एका पदकाची भर पडली आहे. भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवले. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळाले. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. या विजयामुळे भारताने ऑलिंपिकमधील पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर सत्यात उतरवले आहे.
या विजयानंतर संपूर्ण देशातून आपल्या हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक राजकारणी, खेळाडू, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत. यात आपले कलाकार देखील मागे नाहीत. शाहरुख खान, अक्षय कुमारसोबत तापसी पन्नूने देखील ट्वीट करत त्यांचा आनंद वक्त केला आहे.
शाहरुख खान-
शाहरुख खानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, “खूपच सुंदर भारतीय पुरुष हॉकी संघाला खूप शुभेच्छा. काय सुंदर सामना झाला.”
Wow!! Indian Men’s Hockey Team Congratulations. Resilience and skill at its peak. What an exciting match.
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 5, 2021
तापसी पन्नू-
तापसीने तिच्या संदेशात लिहिले, “अजून एक कांस्य पदक.’
And it’s a bronze !!!!!!! ???????? https://t.co/xaZp4Mvwkl
— taapsee pannu (@taapsee) August 5, 2021
अक्षय कुमार-
“भारतीय पुरुष हॉकी संघाला इतिहास रचल्यामुळे खुप खूप शुभेच्छा. ४१ वर्षानंतर भारताला ऑलम्पिकमध्ये पदक. काय सुंदर सामना होता आणि काय सुंदर पुनरागम होते,” असे अक्षय आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला.
Congratulations Team India on rewriting history! An Olympic medal after 41 years! What a match, what a comeback! #Tokyo2020 pic.twitter.com/3mdym3Cupa
— Akshay Kumar (@akshaykumar) August 5, 2021
अनिल कपूर-
“अद्भुत विजय! आज जर माझे वडील असते, तर त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी या ऐतिहासिक दिवसाला पाहिले असते. आज ते जिथे कुठे असतील, तिथे हा पराक्रम पाहून नक्कीच खुश होत असतील. भारतीय पुरुष हॉकी संघाला खूप खूप शुभेच्छा,” असे म्हणत अनिल कपूर यांनी भारतीय संघाचे कौतुक केले.
Phenomenal win .. wish my dad was alive to see this historic day will be happy up there .. Thank you so much men’s hockey team ..congratulations !!! https://t.co/WZEzM0e5db
— Anil Kapoor (@AnilKapoor) August 5, 2021
अशाप्रकारे इतर अनेक कलाकारांनी भारतीय हॉकी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’