खरंच! ‘इंडियन आयडल १२’ स्क्रिप्टेड आहे? स्पर्धक आशिष कुलकर्णीने सांगितली सत्यता


टेलिव्हिजनवरील सध्या सर्वात चर्चेत असणारा रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल 12’ होय. यावर्षी शो जरा जास्तच रंगात आला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच हा शो प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. कधी पाहुणे, तर कधी स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे शो चांगलाच गाजत आहे. आशिष कुलकर्णी हा या सिझनमधील टॉप 7 स्पर्धकांपैकी एक आहे. कोरोनामुळे शोच्या शूटिंगमध्ये काही अडथळा आला आहे. त्यात स्पर्धक गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबाला भेटले नाहीये. यातच आता शोच्या निर्मात्यांनी सगळ्या स्पर्धकांना त्यांच्या घरी पाठवले आहे. 

माध्यमातील वृत्तानुसार, आशिष त्याच्या परिवाराला भेटल्यानंतर तो माध्यमांशी बोलला. त्याने या दरम्यान त्याचा अनुभव शेअर केला. तसेच अनेक प्रश्नांची उत्तरं देखील दिली. त्याला विचारले की, हा शो स्क्रिप्टेड आहे का?? यावर त्याने उत्तर दिलं की, “या शोमधील कोणताही परफॉर्मन्स स्क्रिप्टेड नाहीये. जर कुणाचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही, तर निगेटिव्ह कमेंट देखील येतात. हा शो नॅचरल आणि ऑरगॅनिक आहे. आम्ही जसा परफॉर्मन्स देतो, तसाच तुम्हा सर्वांना दाखवला जातो. यामध्ये काहीही बदल केला जात नाही. जर तुम्ही चांगले गायलात, तर तुमचे कौतुक हे होणारच आणि जर तुम्ही चांगले नाही गायलात, तर तुम्हाला ओरडा देखील खावा लागतो. बाकी ज्या काही गोष्ट होतात त्या मनोरंजनाचा एक भाग असतो. हा आमचा एक प्रवास आहे. तो स्क्रिप्टेड नसून खरा आहे.”

त्याच्या सह- स्पर्धकांबाबत आशिषने सांगितले की, “आम्ही सगळे एकमेकांसोबत राहतो. त्यामुळे आमचा बाँड खूप चांगला झाला आहे. जेव्हा आमच्या मैत्रीची कहाणी दाखवली जाते, तेव्हा वातावरण एकदम खुश असते. आमच्या परफॉर्मन्सआधी आम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये असतो, पण असे क्षण आले की, आम्ही एकदम फ्रेश होतो. जर फक्त परफॉर्मन्स झाले, तर वातावरण खूप गंभीर होऊन जाते.”

“एक कलाकार म्हणून आपण आपल्या कामाबाबत खूप इमोशनल असतो. आज आपण जे काही आहोत ते प्रेक्षकांमुळे आहोत. त्यामुळे आपल्याला जेव्हा निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळते, तेव्हा आपल्याला ती पॉझिटिव्ह पद्धतीने घेतली पाहिजे. आपण त्यावर मेहनत घेऊन काम केले पाहिजे. जेणेकरून ज्या गोष्टीमुळे आपल्याला निगेटिव्ह कमेंट मिळाल्या आहेत, त्या गोष्टी नीट करून आपण प्रेक्षकांसमोर जाऊ शकतो,” असेही ट्रोलिंगबाबत आशिषने सांगितले.

आशिषने पुढे सांगितले की, “आत्तापर्यंत त्याला जेवढे ट्रोल केले आहे, तेवढे त्याने ते सकारात्मक पद्धतीने घेतले आहे. लोकं त्यांची मतं सांगत असतात, यात चुकीचं काहीच नाहीये. जे त्यांना आवडतं नाही त्यासाठी आपण मेहनत घेऊन त्यांचे मन जिंकले पाहिजे. प्रेक्षक आपले माय बाप आहेत. त्यांचा निर्णय हा अंतिम असतो.” (Indian ideol 12 contestant Ashish kulkarni give interview, share his experience)

‘इंडियन आयडल 12’ हे पर्व चांगलेच गाजले आहे. आता या पर्वात कोण विजेता होणार आहे. याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.