अरे व्वा! आशा भोसले यांच्यासह ‘गानकोकिळा’ लता मंगशेकर वाढवणार ‘इंडियन आयडल १२’ची शोभा


टीव्ही क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आइडल.’ या शोने आजपर्यंत संगीत क्षेत्राला अनेक मोठे आणि चांगले कलाकार दिले आहेत. संगीत क्षेत्रात येणाऱ्या मंडळींसाठी हा शो उत्तम पर्याय आहे. सध्या या शोचे १२ वे पर्व सुरू आहे. इतर सर्व पर्वांपेक्षा हे पर्व चांगलेच गाजताना आणि वादात अडकताना दिसत आहे. मात्र, असे असूनही शोची लोकप्रियता काही कमी झाली नाही. प्रत्येक आठवड्यला या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावताना दिसतात.

या आठवड्यात सर्व प्रेक्षकांना अशी जोडी पाहायला मिळणार आहे, जी संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी आणि इतर कलाकारांसाठी देव म्हणून ओळखली जाते. ही जोडी आहे भारतरत्न लता मंगेशकर आणि आशा भोसले. या दोन बहिणींनी भारतीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यात आणि या संगीताला जगभर ओळख मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. प्रेक्षकांना या दोन बहिणींना इंडियन आयडलच्या मंचावर ‘याची देही याची डोळा’ बघण्याचे भाग्य लाभणार आहे.

मात्र, लता मंगेशकर या त्यांच्या तब्येतीमुळे स्वतः मंचावर उपस्थित न राहता व्हर्च्युअल माध्यमातून हजर असणार आहे. व्हिडिओ कॅमेराच्या माध्यमातून त्या सर्व स्पर्धकांचा परफॉर्मन्स बघून त्यांचे मनोबल देखील वाढवणार आहेत.

‘इंडियन आइडल १२’ च्या टीमने लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना या शोमध्ये आमंत्रित केले होते. पण लता मंगेशकर यांना त्यांच्या वयामुळे स्वतः उपस्थित राहणे शक्य नव्हते. मग त्यांना वर्च्युअल माध्यमातून उपस्थित राहण्याबद्दल विचारले असता त्यांनी होकार दिला. म्हणून त्यांच्यासाठी व्हिडिओ कॅमेरा माध्यम वापरण्यात आले. आशा भोसले यांनी शोमध्ये उपस्थित राहण्यास होकार दिला. या भागाची शूटिंग पूर्ण झाली असून, लवकरच हा भाग टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे.

लता दीदी इंडियन आयडल शो च्या खूप मोठ्या प्रशंसक आहे. त्या या पर्वत आल्या नसल्या, तरीही अनेकदा परीक्षक असलेल्या मनोज मुंतशिर यांनी स्पर्धकांची गाणी दीदींना ऐकवली होती. त्यावर त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केल्याचे देखील मनोज मुंतशिर यांनी सांगितले होते. आशा भोसले यांना रियॅलिटी शो खूप आवडतात. या शोच्या सहाव्या पर्वात त्यांनी सलीम मर्चंट, अनु मलिक आणि सुनिधी चौहान यांच्यासोबत परीक्षकांची भूमिका निभावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर

-वाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’


Leave A Reply

Your email address will not be published.