Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरेरे! पवनदीप अन् अरुणिताच्या लव्हस्टोरीवर चाहते आहेत नाराज; म्हणतायत ‘फेक लव्ह एँगल’

टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ सातत्याने चर्चेत आहे. दरदिवशी या शोमधील कोणता ना कोणता एपिसोड वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. कधी परीक्षकांमुळे, कधी स्पर्धकांमुळे, तर कधी पाहुण्यांमुळे. काही एपिसोड असे असतात, ज्यामुळे स्पर्धक आपला सर्व राग निर्मात्यांवर काढतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल हे ‘इंडियन आयडल १२’ सिझनमधील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेतील स्पर्धक आहेत. सोशल मीडियावर त्यांची दमदार फॅन फॉलोविंग आहे. पवनदीपच्या चाहत्यांनी शोच्या प्रक्रियेवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. पुन्हा एकदा पवनदीपच्या चाहत्यांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. (Indian Idol 12 Fans Are Angry On Contestant Pawandeep Arunita Fake Love Story Cooked By Makers)

सोशल मीडियावर केला राग व्यक्त
खरं तर पवनदीप आणि अरुणितामध्ये ज्याप्रकारे शोमध्ये लव्ह एँगल दाखवला जात आहे, ते पवनदीपच्या चाहत्यांना फार काही आवडलेला नाही. त्यांनी या गोष्टीला फेक म्हटले आहे. शोमध्ये पवनदीप आणि अरुणितामध्ये प्रेम दाखवून शोमध्ये मसाला टाकल्याचे म्हटले जात आहे.

दुसरीकडे या गोष्टीने पवनदीपचे चाहते मात्र भलतेच नाराज झाले आहेत. चाहत्यांनी म्हटले आहे की, “तो प्युअर आहे, त्याला खराब करू नका.” त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, चाहत्यांना निर्मात्यांनी शोमध्ये समाविष्ट केलेली लव्हस्टोरीची कल्पना आवडली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ‘इंडियन आयडल १२’शो प्रेक्षकांच्या निशाण्यावर आला आहे.

https://twitter.com/A_Mysticc/status/1414801176470593551

पवनदीपने दिलंय नात्यावर स्पष्टीकरण
पवनदीप राजनने म्हटले होते की, तो आणि अरुणिता फक्त चांगले मित्र आहेत. दोघांचीही जोडी प्रेक्षकांना पसंत आहे. तो म्हणाला होता की, “आमचे जे नाते आहे, ते असे आहे की, आम्ही फक्त खूप चांगले मित्र आहोत. ही केवळ मैत्री आहे आणि याला इतर काही नाव देऊ नका.” तरीही हे पाहणे रंजक ठरेल की, पवनदीप आणि अरुणितामध्ये खरं जवळीक वाढतेय की, शोचे निर्माते असे करत आहेत?

पवनदीप आहे दुखी
आशिष कुलकर्णी शोमधून बाहेर झाल्यामुळे पवनदीप सध्या खूपच दुखी आहे. आशिष हा पवनचा रूम पार्टनर होता. पवनदीपला विश्वास होत नाहीये की, त्याचा सर्वात चांगला मित्र शोमधून बाहेर गेला आहे आणि आता तो परत येणार नाही. त्याने फोन करून आशिषला आपल्या या खेळाबाबत सांगितले होते की, तो त्याला किती मिस करत आहे. अशे वाटत आहे की, जसे आशिष शोमधून नाही, तर बाजारमधून काहीतरी घेण्यासाठी बाहेर गेला आहे आणि लवकरच पुनरागमन करेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा