टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेल्या रियॅलिटी शोपैकी एक म्हणजे ‘इंडियन आयडल १२’ होय. इंडिय आयडलची सुरुवात सन २००४ मध्ये झाली होती. या शोमध्ये भाग घेणारे स्पर्धक आज घराघरात पोहोचले आहेत. दरवर्षीप्रमाणे ‘इंडियन आयडल’च्या १२ व्या हंगामात असे स्पर्धक आले, ज्यांनी सर्वांच्या मनात मानाचं स्थान बनवलं. या स्पर्धकांमधील एक म्हणजेच अरुणिता कांजिलाल होय. अरुणिता या हंगामातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे. जेव्हा ती मंचावर आपल्या गायनाचे सादरीकरण करते, तेव्हा ती प्रेक्षकांना अक्षरश: मंत्रमुग्ध करते. सोशल मीडियावरही चाहते तिचे गाणे वारंवार ऐकतात. ती जेव्हा सादरीकरण करते, तेव्हा परीक्षकदेखील उभे राहून तिच्यासाठी टाळ्यांचा पाऊस पाडतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. जिथे शोमध्ये परीक्षक बनून आलेली नेहा कक्करची बहीण सोनू कक्करने अरुणिताला खास भेट दिली आहे. (Indian Idol 12 Neha Kakkar Sister Sonu Kakkar Impressed By Arunita Kanjilal Performance)
नवीन परीक्षक बनून आली सोनू कक्कर
सोनू कक्करची लहान बहीण असलेली नेहा कक्कर या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली होती. मात्र, मागील काही काळापासून ती या शोमधून गायब आहे. तरीही, माध्यमांतील वृत्तानुसार, हिमेश रेशमियानंतर नेहादेखील शोमध्ये पुनरागमन करणार आहे. मात्र, ती केव्हा येईल याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाहीये. नेहाच्या जागी सध्या सोनू शोमध्ये हिमेश आणि अनु मलिकसोबत परीक्षकाची भूमिका निभावत आहे. सोनूदेखील व्यावसायिकरीत्या एक गायिका आहे. जेव्हा परीक्षक बनून आलेली सोनू अरुणिताचे सादरीकरण पाहून स्वत: ला रोखू शकली नाही. तिने थेट मंचावर जाऊन तिला खास भेट दिली.
सोनूने दिली देवी माताची ओढणी
अरुणिताचा आवाज ऐकून सोनू इतकी प्रभावित झाली की, तिने थेट मंचावर जाऊन अरुणिताला देवा माताची ओढणी भेट म्हणून दिली. सोनूने केवळ तिला ओढणी दिलीच नाही, तर ती तिला घातलीदेखील.
अरुणिताच्या सादरीकरणाबद्दल बोलताना सोनू म्हणाली की, “हे माझे सौभाग्य आहे की, इंडियन आयडलसारख्या या खास मंचावर मला या प्रतिभावान गायिकेला ऐकण्याची संधी मिळाली. मी तुझ्या सादरीकरणाने खूप खुश आहे. तुझा आवाज खूपच गोड आहे आणि भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा! तुझ्या सादरीकरणासाठी मला तुला देवी माताची ओढणी भेट म्हणून द्यायची आहे.”
देवी माताची ओढणी मिळाल्याने भावुक झाली अरुणिता
अरुणिता सोनू कक्करकडून भेट म्हणून देवी माताची ओढणी मिळाल्याने खूपच भावुक झाली. ती म्हणाली की, “सोनू मॅमकडून ही भेट मिळाल्याने मी खूप भावुक झाले आहे. इंडियन आयडलने मला ती गायिका बनवले आहे, जी आज मी आहे. मी सर्व परीक्षक आणि चाहत्यांची आभारी आहे की, त्यांनी नेहमी मला हे प्रेम, सन्मान आणि तुमचे योगदान दिले. सोनू मॅमकडून देवा माताची ओढणी मिळाल्याने मी धन्य झाले. मी आशा करते की, नेहमीच मी याचप्रकारे या मंचावर गाणे गाऊ आणि त्या सर्व गाण्यांना न्याय देऊ.”
शोमधील या हंगामात अरुणिता आणि पवनदीप राजन आहेत सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक
या सिंगिंग शोमध्ये येऊन प्रत्येकानेच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, चाहत्यांना सर्वाधिक आवडलेले स्पर्धक आहेत अरुणिता कांजिलाल आणि पवनदीप राजन. या दोघेही या हंगामातील सर्वाधिक लोकप्रिय गायक आहेत. त्यांचे गाणे ऐकल्यानंतर शोचे परीक्षकही त्यांची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. या दोघांमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूपच आवडते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…
-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती
-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या