धर्मेंद्र अन् अनिता लावणार ‘इंडियन आयडल १२’मध्ये हजेरी; पवनदीप, सायलीसह ‘हे’ स्पर्धक देणार परफॉर्मन्स


सोनी टीव्हीवरील सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ हा एक लोकप्रिय शो आहे. टेलिव्हिजनवरील हा सर्वात चर्चेत असणारा शो आहे. या शोमध्ये आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र येणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री अनिता राज या देखील येणार आहेत. या आठवड्यात या शोची थीम धर्मेंद्र आणि अनिता राज स्पेशल असणार आहे.

बॉलिवूडमधील या दिग्गज कलाकारांसमोर या शोमधील स्पर्धक परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. चला तर त्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर एक नजर टाकूया. (Indian idol contestant perform infront of Dharmendra and Anita Raj)

सायली कांबळे
इंडियन आयडलच्या मंचावर स्पर्धक सायली कांबळे ही ‘अब के सजन सावन मैं’ हे गाणे गाणार आहे. सायलीच्या या गाण्यानंतर धर्मेंद्र आणि अनिता राज यांनी तिचे खूप कौतुक केले. धर्मेंद्र तिला म्हणतात की, तिच्या गाण्यात खणक आणि लचक आहे. तिने ज्या पद्धतीने हे गाणे गायले आहे, ते ऐकून सर्वजण भारावून जातात.

पवनदीप राजन
पवनदीप हा लोकप्रिय गाणे ‘ओठों से छू लू तो, मेरा गीत अमर कर दो’ हे गाणे गाणार आहे. हे गाणे ऐकून धर्मेंद्र पवनदीपचे कौतुक करताना दिसणार आहेत. ते कौतुक करताना पवनदीपला म्हणतात की, “तुझा आवाज कमाल आहे. तसेच तुझ्यात जबरदस्त टॅलेंट आहे. याआधी देखील मी तुझी गाणी ऐकली आहेत.” तसेच धर्मेंद्र त्याला खास गिफ्ट देताना दिसणार आहेत.

शनमुखप्रिया
शनमुखप्रिया ही धर्मेंद्र आणि अनिता राजसमोर ‘मेरा प्यार शालीमार, तेरा प्यार शालीमार’ हे गाणे एका वेगळ्याच अंदाजात गाताना दिसणार आहे. तिचे हे गाणे अभिनेते धर्मेंद्र यांना खूप आवडले आहे. हे गाणे ऐकून त्यांनी तिचे खूप कौतुक केले. ते म्हणाले की, “तुझे गाणे ऐकून केवळ वेडेपणा दिसतो.” तसेच या शोची परीक्षक सोनू कक्कर देखील तिचे भरभरून कौतुक करताना दिसणार आहे.

दानिश खान
दानिश खान या एपिसोडमध्ये ‘सुनाई देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है’ हे गाणे गाणार आहे. त्याचे हे गाणे ऐकून अनिता राज त्याचे खूप कौतुक करताना दिसणार आहे.

त्याच्या या गाण्याने त्या खूप प्रभावित होतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.