Tuesday, July 9, 2024

सनी लिओनीने लाॅंच केला तिचा एआय अवतार, बनली भारताची पहिली AI रेप्लिका असणारी बॉलिवूड अभिनेत्री

सनी लियोनीने (Sunny Leone) बाॅलीवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. आणि आता ही अभिनेत्री एआय रेप्लिका असणारी भारतातील पहिली व्यक्ती ठरणार आहे.तिने मुंबईत झालेल्या एका भव्य कार्यक्रामात तिचा हा एआय अवतार लाॅंच केला आहे.

आर्टिफिशियल इंटॅलिजन्स स्टार्टपसोबत केलं कोलॅबरेशन
सनी लियोनीने हा एआय क्लोन बनवण्यासाठी दिल्लीतील एका आर्टिफिशिअल इंटॅलिजन्स स्टार्टपची मदत घेतली आहे. कमोटो एआय असं या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने एआय जनरेशनमधून पैसे कमावण्याचे माॅडेल शोधले आहे. त्यामुळे अभिनेत्री आणि अंत्रप्रिनोर सनी लियोनिने या कंपनीसोबत पार्टनरशीप करुन तिचा एआय क्लोन बनवला आहे.

म्हणाली क्लोनिंग तसंही होणारच आहे
तिच्या एआय रेप्लिकाच्या या निर्णयाबद्दल ती म्हणाली, “ही एक प्रगतीशील जोखीम आहे. आज इंटरनेटवर चुकीच्या माणसांकडे मोठमोठ्या व्यक्तींचे एआय क्लोन बनवलेले आहेत,क्लोनिंग तसंही होणार आहे. त्यामुळे मी असा विचार केला की, दुसऱ्या कोणी असं करण्याआधी मीच माझा एआय अवतार बनवून त्यावर नियंत्रण ठेवेल. पुढे ती म्हणाली, जेव्हा एआय अवतार आपल्या मालकीचा असतो तेव्हा त्यात काय माहीती टाकायची, किंवा ते कसं माॅडेल करायचं हे तुम्ही ठरवता.”

X वर व्हिडीओ केला पोस्ट
सनीने तिच्या या नवीन इंटरऍक्टीव एआयबद्दल आनंद व्यक्त करताना एक्स हॅंडलवर एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहीले आहे,” मला विश्वासच बसत नाही ही मी आहे, आता तुम्ही सर्वजण तुम्हाला वाटेल तेव्हा माझ्याशी काॅलवर किंवा चॅटवर बोलु शकता, ” पुढे हे एआय बनवलेल्या तिच्या सहकारी कंपनीचा उल्लेख देखील तिने कॅप्शनमध्ये केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘अशी’ आहे बॉलिवूडच्या मोगॅंबोच्या आयुष्याची खरी कहाणी, जाणून घ्या अमरीश पुरी यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी
प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता, आगामी ‘कल्की’ सिनेमाला मिळाली सेन्सर बोर्डाची परवानगी

हे देखील वाचा