बॉलिवूड कलाकारांसंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मग ते त्यांचे आगामी चित्रपट असो किंवा बालपणीचे फोटो असो. अलिकडच्या काळात बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषतः चाहत्यांना त्यांचे बालपणीची फोटो पाहायला खूप आवडतात. आजकाल असे दिसते आहे की, सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाला आहे की, फॅन पेज त्यांच्या आवडत्या कलाकारांचे फोटो पोस्ट करून त्यांना ओळखण्याचे आव्हान देतात. अनेक कलाकारांचे फोटो पाहून चाहत्यांना ते खरोखरच त्यांचे आवडते कलाकार असल्याचा अंदाज लावणे कठीण जात आहे. अशातच एका सुपरस्टार अभिनेत्याचा बालपणीचा फोटो समोर आला आहे, जो चाहत्यांच्या ओळखीसाठी परीक्षेपेक्षा कमी नाही. हा फोटो पाहिल्यानंतर बहुतांश लोकांनी आपले डोके धरले आहे.
नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक मुलगा हातात पुस्तक घेऊन उभा आहे. या मुलाच्या निरागसतेने लोकांची मने जिंकली आहेत. तुम्ही अजूनही या छोट्या मुलाला ओळखू शकला नाही का? फोटोमध्ये दिसणारे हे मूल दुसरे कोणी नाही, तर फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार कमल हासन आहेत. होय, हे साऊथ सिनेसृष्टीतील स्टार कमल हासन आहेत.

कमल हासन यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी दोन लग्ने केली आहेत. त्यांनी पहिले लग्न १९७८ मध्ये वाणी गणपतीशी, तर दुसरे लग्न सारिकाशी केले. मात्र, हे नातेही फार काळ टिकले नाही. सारिका आणि कमल हासन यांना श्रुती आणि अक्षरा हासन नावाच्या दोन मुली आहेत.
कमल हासन यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ते तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसले आहेत. त्यांना आतापर्यंत ४ राष्ट्रीय पुरस्कार, १७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. पटकथा लेखक म्हणून त्यांनी पहिल्यांदा ‘उनारचिगल’ लिहिले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा लीक झाले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटो, तर ‘या’ कारणामुळे केलं होतं अभिनेत्रीने धर्मपरिवर्तन
-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’