Monday, August 4, 2025
Home अन्य खुशखबर! चित्रपटगृहे उघडल्यानंतर मल्टिप्लेक्सकडून मोठी भेट; प्रेक्षक मोफत घेणार चित्रपट पाहण्याचा आनंद

खुशखबर! चित्रपटगृहे उघडल्यानंतर मल्टिप्लेक्सकडून मोठी भेट; प्रेक्षक मोफत घेणार चित्रपट पाहण्याचा आनंद

कोरोनामुळे मल्टिप्लेक्स बऱ्याच काळापासून बंद होते. ते आता शुक्रवारपासून (२२ ऑक्टोबर) सुरू होत आहेत. पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यामध्ये आणखी भर घालण्यासाठी मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्स लेझर लिमिटेड प्रेक्षकांसाठी एक अद्भुत भेट घेऊन आली आहे. मल्टिप्लेक्स भेटवस्तू म्हणून चित्रपटाची तिकिटे मोफत वाटत आहेत.

मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्स लेझर लिमिटेडने जाहीर केले आहे की, ते २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी महाराष्ट्रात कोणताही चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या सिनेमागृहात येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना बिनशर्त मोफत तिकीट देतील. प्रेक्षकांना ही ऑफर आयनॉक्स वेबसाईट आणि ऍपवर मिळेल. येथे तुम्ही सकाळी ९ ते १० पर्यंत बुकिंग करून ही मोफत तिकिटे घेऊ शकता. केवळ महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनाच आयनॉक्सच्या या ऑफरचा लाभ मिळू शकतो. या उपक्रमाद्वारे, आयनॉक्सला फक्त आपल्या पाहुण्यांचे आभार मानायचे आहेत.

आयनॉक्स लेझर लिमिटेडचे रिजनल डायरेक्टर (पश्चिम) अतुल भांडारकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील चित्रपटगृहे शेवटी पुन्हा सुरू होण्यास तयार असल्याने आम्ही आमच्या पाहुण्यांना त्यांनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल बिनशर्त धन्यवाद देऊ इच्छितो.” ते पुढे म्हणाले की, “आमच्या पाहुण्यांचे स्वागत म्हणून आम्ही त्यांना २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी ९ ते १० या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सर्व मॉर्निंग शोसाठी मोफत तिकिटे देत आहोत. भारत कोव्हिड- १९ च्या विळख्यातून बाहेर पडत असताना, आम्ही राज्यभरातील चित्रपटप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज आहोत.”

साथीच्या आजारामुळे बंद झालेली चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्यामुळे इंडस्ट्रीतील व्यवसाय पुन्हा वाढण्याची संधी मिळेल. सिनेमा हॉल आणि थिएटर ५० टक्के क्षमतेसह पुन्हा सुरू होतील. ज्यांनी पूर्णपणे लसीकरण केले आहे, त्या प्रेक्षकांनाच चित्रपटगृहात येण्याची परवानगी असेल. सर्व प्रेक्षकांना मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे, खोकताना आणि शिंकताना चेहरा झाकणे आणि हाताची नियमित स्वच्छता यासह कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

हे देखील वाचा