Friday, July 5, 2024

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी समंथा करायची पार्ट टाईम जॉब, आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण, लग्नात झाला होता १० कोटी खर्च

टॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तसेच आपल्या उत्त्तम कामगिरीचा झेंडा रोवत त्यांनी टॉलिवूडमध्ये आपले नाव पक्के केले आहे. टॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये नाव घेतले जाते ते आघाडीची अभिनेत्री समंथा अक्किनेनीचे. तिने कमी वयातच आपल्या अभिनयाची कमाल दाखवून दिली. ती केवळ तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, तर तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. चाहते तिची एक झलक बघण्यासाठी कायमच आतुर असतात. समंथा बुधवारी (२८ एप्रिल) तिचा ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग आज समंथाच्या आयुष्यातील गोष्टींचा उलगडा करूया…

समंथा तिच्या आकर्षक अंदाजाने तसेच तिच्या सौंदर्यासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते कायम वाट बघत असतात. समंथाचा जन्म २८ एप्रिल, १९८७ ला चेन्नईमध्ये झाला होता. समंथा चित्रपटात येण्याआधी पार्ट टाईम जॉब करत होती, परंतु तिला पैशांची चणचण भासत होती. त्यानंतर तिने या सिनेजगतात पाऊल ठेवले. मग काय बघता बघता ती प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली.

समंथाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेता, नागा चैतन्यशी समंथा अक्केनेनीचे लग्न झाले आहे. त्यांचे घर हैदराबादमध्ये आहे. समंथा आणि नागा चैतन्यच्या घरात एका मोठी थिएटर रूम आहे, जिथे संपूर्ण कुटुंब आरामात बसून,चित्रपट पाहू शकतात.

https://www.instagram.com/p/CDsmYEpBt4R/?utm_source=ig_web_copy_link

समंथा आणि नागा चैतन्यचे लग्न खूप शाही लग्न मानले जाते कारण, त्यामध्ये सुमारे १० कोटी रुपये खर्च झाले होते. यानंतर या दोघांच्या लग्नाचे भव्य स्वागत हैदराबादमध्ये झाले होते. ज्यामध्ये बॉलिवूड, टॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील बडे दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. लग्नानंतर समंथा आणि नागाचैतन्य ४० दिवसांच्या हनीमूनवर गेले होते.

https://www.instagram.com/p/B10h8AphBgR/?utm_source=ig_web_copy_link

समंथाला शेती करणे खूप आवडते. तिने आपल्या घरात खूप मोठे शेत तयार केले आहे. जिथे ती स्वत: ताज्या भाज्याही घेत असते, तर त्याचवेळी तिच्या घरातील सर्व खोल्या घराच्या इतर खोल्यांमधून एकमेकांशी जोडलेल्या आहेत.

आता वळूयात समंथाच्या चित्रपट कारकिर्दीकडे, जिकडे तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. २०१० मध्ये ‘या माया चेस्वे’ चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले होते. समंथाचे आता दरवर्षी किमान तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होत असतात. समंथाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट तमिळ, मल्याळम आणि तेलुगु या भाषेत दिले आहेत. मुख्यत: तमिळमध्ये विजय सेतुपतीसमवेत मर्सेल आणि तेलुगुमध्ये रामचरण याच्यासह रंगस्थलम हे समंथासाठी सुपरहिट ठरले होते. २०१३ मध्ये समंथाने तेलुगु आणि तमिळ या भाषेतील चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता.

समंथा अक्किनेनी ही आपल्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. लोक तिच्या ड्रेसिंग सेन्सची कॉपी देखील करतात. अभिनेत्री नेहमी साधी दिसते, पण तरीही लोकांचे लक्ष वेधून घेते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘३ इडियट्स’सारख्या चित्रपटात काम करूनही अभिनेत्याला ‘या’ चित्रपटासाठी द्यावे लागले होते तब्बल ४० वेळा ऑडिशन; वाचा संघर्षमय प्रवास

-‘या’ अभिनेत्रीने वयाच्या ५ व्या वर्षापासून केली होती अभिनयाला सुरुवात, साखरपुड्यानंतर २ वर्षांनी झाला होता होणाऱ्या पतीचा मृत्यू

हे देखील वाचा