Thursday, April 18, 2024

‘3 इडियट्स’सारख्या चित्रपटात काम करूनही अभिनेत्याला ‘या’ चित्रपटासाठी द्यावे लागले होते तब्बल 40 वेळा ऑडिशन; वाचा संघर्षमय प्रवास

बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी अशा कलाकारांच्या यादीत सामील होतो, ज्याने सोलो अभिनेता म्हणून तर मोठे चित्रपट नाही केले, परंतु बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. शरमनने बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पात्रे साकारली आहेत. मात्र, विनोदी भूमिकेत प्रेक्षकांनी त्याला सर्वाधिक पसंती दिली. शुक्रवारी (28 एप्रिल) शरमन आपला 44वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या खास प्रसंगी आपण त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर एक नजर टाकूया…

वाईट अभिनयासाठी केली जायची निंदा
शरमन जोशीचा जन्म 28 एप्रिल, 1979 रोजी मुंबई येथे झाला होता. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीपासून केली होती. त्याचे वडील अरविंद जोशी सुप्रसिद्ध गुजराती रंगमंच आणि चित्रपट कलाकार होते. शरमनचा पहिला चित्रपट सन 1999मध्ये प्रदर्शित झालेला ‘गॉडमदर’ होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, सुरुवातीला त्याची कॉमिक टायमिंग अतिशय वाईट होती. तो म्हणाला होता, “लोकांनी माझी खूप निंदा केली, पण आमचे दिग्दर्शक शफी इनामदार यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. जवळपास 50 कार्यक्रम केल्यानंतर माझ्या अभिनयात सुधार झाला.”

‘फरारी की सवारी’साठी 40वेळा द्यावे लागले ऑडिशन
शरमनने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरीही त्याच्या हिट लिस्टमध्ये ‘गोलमाल’, ‘स्टाईल’, ‘3 इडियट्स’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘एक्सक्यूज मी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, ‘रंग दे बसंती’ आणि ‘3 इडियट्स’ सारख्या चित्रपटात काम केलेल्या शरमनला ‘फरारी की सवारी’ या चित्रपटासाठी तब्बल 40 वेळा ऑडिशन द्यावे लागले होते. ‘फरारी की सवारी’चे निर्माता विधू विनोद चोप्रा होते. यात चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी, शरमनला खूप मेहनत करावी लागली होती.

‘मी लांब पल्ल्याचा घोडा आहे’
सन 1999 मध्ये आलेल्या ‘गॉडमदर’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकल्यानंतर, तब्बल 13 वर्षानंतर शरमन मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट 2012 मध्ये आलेला ‘फरारी की सवारी’ होता. मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्याला इतका वेळ का लागला? या प्रश्नाचे उत्तर देत शरमनने एका मुलाखतीत सांगितले, ‘भाऊ पाहा, मी लांब पल्ल्याचा घोडा आहे. मला घाई नाही. मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की, मी जो चित्रपट करेल तो एक जबरदस्त चित्रपट असेल. तुमचा वेळ आणि तुमच्या पैशांसाठी पात्र असेल. जेव्हा आपल्याला फक्त चांगले काम करायचे असेल, तेव्हा वेळ लागतोच आणि मी माझा वेळ द्यायला तयार आहे.”

‘पुढील 30 वर्षांपर्यंत इंडस्ट्रीमध्ये कार्यरत राहील’
आपले बोलणे पूर्ण करत शरमन म्हणाला, “जर मी माझ्या आयुष्यात किमान दहा चांगले चित्रपट केले असतील, तरीही मला माझा अभिमान वाटेल. तसे दहा तर कमीत कमी आहेत, पण मला बरेच चांगले चित्रपट करायची इच्छा आहे. माझा विश्वास आहे की, मी पुढच्या 30 वर्षांपर्यंत इंडस्ट्रीमध्ये कार्यरत राहील आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मी बरेच उत्तम आणि मनोरंजक चित्रपट करण्याचा प्रयत्न करेन.”

प्रेम चोप्रा यांचा जावई
शरमन जोशी बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध खलनायक- अभिनेते प्रेम चोप्रा यांचा जावई आहे. प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्राशी त्याने लग्न केले आहे. या जोडप्याला एक मुलगी व दोन मुलेही आहेत.

लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये दिसणार
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. (sharman joshi birthday know lesser known and interesting facts about 3 idiots raju)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : पैसे कमावण्यासाठी समंथा रूथ प्रभेने केले होते मॉडेलिंगमध्ये पदार्पण, ‘इतके’ होते पहिले मानधन
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा