Saturday, April 19, 2025
Home साऊथ सिनेमा दोन दिवस फुकत होता बिड्या; सुपरस्टार यशला कॉपी करणे पडले महागात, फुफ्फुसाचा झाला….

दोन दिवस फुकत होता बिड्या; सुपरस्टार यशला कॉपी करणे पडले महागात, फुफ्फुसाचा झाला….

चित्रपटसृष्टी ही एक अशी गोष्ट आहे, ज्यात लोकं ग्लॅमर आणि पैशाच्या मागे धावतो. या सगळ्यात कलाकारांना त्यांचा एक वेगळा फॅन फॉलोविंग देखील तयार करायचा असतो. त्यांचे फॅन्स देखील असे वाटते की चित्रपटात आहेत तसेच हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्य देखील आहेत. आणि ते देखील कलाकारांची स्टाईल, बोलणं कॉपी करतात. परंतु फॅन्स ही गोष्ट विसरतात की, या सगळ्या गोष्टी चित्रपटात घडतात. सध्या ‘केजीएफ २’ हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. यातील अभिनेता यशने (yash) सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

दुसऱ्या भागात देखील यशने प्रेक्षकांना नाराज केले नाही. या चित्रपटातील त्याची स्टाईल अनेकांना आवडली आहे. त्याच्या चाहत्यांना नेहमीच त्याला फॉलो करायचे असते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच त्याचे फॅन झालेत. अशातच त्यांच्या एका चाहत्यांची वाईट घटना समोर आली आहे. चित्रपटात यश स्मोकिंग करताना दाखवला आहे. त्यांच्या लहान १५ वर्षाच्या चाहत्याने नेमकी त्याची तिचा स्टाईल कॉपी केली आहे. त्या मुलाने त्याचा चित्रपट दोन दिवसात तीन वेळा पाहिला.

चित्रपट पाहून झाल्यानंतर त्या मुलाने सलग दोन दिवस सिगारेट ओढल्या. या गोष्टीचा त्यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या फुफुसांवर परिणाम झाल्याचे सांगितले तसेच वय कमी असल्याने त्याला तो डोस झेपला नाही आणि तो आजारी पडला.

त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, आजकाल तरुण पिढी चित्रपटाच्या आहारी गेली आहे. चित्रपटातील अनेक गोष्टी ते आत्मसात करतात. त्यामुळे चित्रपट या अशा गोष्टी दाखवणे बंद केले पाहिजे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा