‘त्या’ व्यक्तीची भेट झाली आणि चित्रपट वितरकाचा मुलगा झाला विनोदी अभिनेता


मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सुप्रसिद्ध कलाकार देवेन वर्मा यांच्याबद्दल. ज्यांनी ७० ते ८० च्या दशकातील चित्रपटांमध्ये आपल्या विनोदाने अक्षरशः जीव ओतला होता. २३ ऑक्टोबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले देवेन वर्मा यांचं खरं नाव देवेंदु वर्मा होतं. ज्याला त्यांनी कॉलेजच्या दिवसांत बदलून ‘देवेन’ करून घेतलं. देवेन वर्मा यांचे वडील बलदेव सिंह वर्मा त्यांच्या जमान्यातील एक सुप्रसिद्ध चित्रपट वितरक होते.

देवेन वर्मा यांचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. देवेन वर्मा यांना लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं. परंतु त्यांनी लॉ विषयाचा अभ्यास करावा अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती. याच द्विधा मनस्थितीत देवेन यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा, परंतु लवकरच कायद्याच्या शिक्षणावरून त्यांचं मन उडालं होतं. असंही सांगितलं जातं की तेव्हा देवेन हे नाटकात काम करायचे आणि सोबतच ते अनेक स्टुडिओजच्या चकरा मारायचे. हळू हळू दिवस सरत गेले आणि १९६१ मध्ये देवेन यांची भेट त्यावेळचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर बीआर चोप्रा यांच्याशी झाली. चोप्रा त्या दिवसांत चित्रपट ‘धरम पुत्र’ बनवणार होते. ज्याला त्यांचे बंधू यश चोप्रा हे दिग्दर्शित करणार होते. बीआर चोप्रा आणि देवेन वर्मा यांची मैत्री झाली होती आणि ही मैत्रीच त्यांच्या करियरचा टर्निंग पॉइंट ठरली होती.

देवेन वर्मा यांनी अंगूर, अंदाज़ अपना-अपना, खट्टा-मीठा यासारख्या अनेक रीजनल चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांना १९७६ आणि १९७९ साली फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता. देवेन वर्मा यांनी १९७१ मध्ये चित्रपट ‘नादान’चं दिग्दर्शन करून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये एका नव्या इनिंगला सुरुवात केली होती. देवेन यांनी ५ चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि ४ चित्रपटांचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. देवेन वर्मा यांनी २ डिसेंबर २०१४ ला या जगाचा निरोप घेतला. मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे होते.


Leave A Reply

Your email address will not be published.