Wednesday, June 25, 2025
Home अन्य रानूचे ठुमके पाहून बॉलिवूड अभिनेत्रीलाही जाल विसरून, पाहा काय आहे तिच्या डान्समध्ये इतकं खास

रानूचे ठुमके पाहून बॉलिवूड अभिनेत्रीलाही जाल विसरून, पाहा काय आहे तिच्या डान्समध्ये इतकं खास

एखाद्या व्यक्तीला एकाच रात्रीत स्टार बनवण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. आतापर्यंत असे अनेक लोक येऊन गेले, ज्यांना सोशल मीडियाने अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. या लोकांपैकीच एक म्हणजे रानू मंडल होय. रानू मंडल २०१९ मध्ये एका रात्रीत स्टार झाली होती. ट्रेनमध्ये गाणी गाणाऱ्या रानूला तिच्या आवाजामुळे प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याने संधी दिली. तिने त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ३ गाणी रेकॉर्ड केली. मात्र, प्रसिद्धी टिकवणे हीदेखील एक मोठी जबाबदारी असते, पण ती रानूला टिकवता आली नाही. असे असले, तरीही तिचे डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

रानू मंडल (Ranu Mandal) हिने तिच्या अनोख्या स्टाईलने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. कधी तिचे बॉलिवूडमधील जुन्या गाण्यांवरील व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी तिचे कच्चा बदाम आणि नवनवीन गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशात तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या ‘मेला’ या सिनेमातील प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

रानू मंडल हिचा डान्स व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. या व्हिडिओत दिसते की, तिने निळ्या रंगाची मॅक्सी परिधान केली आहे. तसेच, सोबत ओढणीही कमरेला बांधत ठुमके लावत आहे. रानू मंडलसोबत एक मुलगाही डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये “आता डान्सदेखील,” असे लिहिले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “यार तू हिच्या घरी राहतो का? तुला हिच्या सतत अपडेट्स मिळतात.” इतर युजर्स हसण्याचे इमोजी पोस्ट करत आहेत.

रानू मंडलबाबत थोडंसं
रानू मंडल ही पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन प्रसिद्ध झाली होती. तिने गायलेले ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ माजली होती. या गाण्याची सर्वत्र चर्चा झाली आणि तिच्या लोकप्रियतेमध्येही कमालीची वाढ झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मोठी बातमी! कपिल शर्माला मिळाली ७ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा, अमेरिकेत झालाय गुन्हा दाखल

‘जबरे पिया’ गाण्यावर बेभान होऊन नाचली रश्मी देसाई, सुंदरता पाहून नजरच हटणार नाही

‘त्या व्यक्तीला जिवंत जाळले गेले, तेव्हा तर…’, उदयपूर हत्याकांडावर स्वरा भास्करने केले मोठे वक्तव्य

हे देखील वाचा