Sunday, June 4, 2023

‘वाट लावलीस बाई…!’ रानू मंडलने स्वत: मेकअप करून गायलं सलमान खानचं गाणं, उमटल्या भन्नाट प्रतिक्रिया

रानू मंडलच्या (Ranu Mandal) गाण्यांचे व्हिडिओ तर नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध असतातच. पण काही काळापासून तिच्या गाण्यांव्यतिरिक्त तिचे डान्स आणि मेकअपचे व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहेत. रानू मंडलकडे आज काम नसले, तरी तिच्या मजेदार आणि विचित्र व्हिडिओंमुळे ती दरदिवशी चर्चेत राहण्यात यशस्वी ठरते. अलीकडेच, ‘श्रीवल्ली’ या गाण्यावरील तिचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर यावेळी तिचा एका गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल.

नुकताच रानू मंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रानू मंडल स्वत: केलेल्या मेकअपमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच ती सलमान खानच्या (Salman Khan) ‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘ओढनी ओढ के नाचू’ हे गाणे क्लासिकल अंदाजात गाताना दिसत आहे. या गाण्यातही रानू तिच्या स्टाईलमध्ये गाण गात चाहत्यांना प्रभावित करत आहे. (ranu mandal did make up by herself then singing salman khan song)

या व्हिडिओवर युजर्सच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळतात. एका यूजरने ‘चलो राणू इज बॅक’ असे लिहिले आहे. यासोबतच एका युजरने कमेंट करून हे गाणे लिहिले की, ‘हे गाणेच बदलून टाकले.’ कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘भाईजानच्या गाण्याची वेगळी स्टाइल आहे, भाऊ, त्यासाठी हिंमत हवी.’

रानू मंडल नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडिओ दरदिवशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. तसेच या विचित्र स्टाईलमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा