‘आयपीएल २०२२’चा अंतिम सामना आज (२९ मे) रात्री ८ पासून खेळवला जात आहे. अहमदाबाद येथे सुरू झालेल्या या सामन्यापूर्वी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रणवीर सिंगसह (Ranveer Singh) अनेक खास पाहुणे पोहोचले आहेत. बॉलिवूड स्टार्ससह क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीही या इव्हेंटसाठी पोहोचल्या आहेत. यावेळी स्टार संगीतकार आणि गायक एआर रहमान (AR Rehman) यांनी दमदार परफॉर्म केला. आयपीएलच्या समारोप समारंभाची सुरुवात रणवीरच्या जबरदस्त परफॉर्मेंसने झाली.
इंडियन प्रीमियर लीग २०२२चा अंतिम सामना राजस्थान आणि गुजरात यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी भव्य समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हा सोहळा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री होस्ट करत आहेत. समारोप समारंभाची सुरुवात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या परफॉर्मन्सने झाली. केजीएफसह अनेक चित्रपटांच्या गाण्यांवर त्याने डान्स केला. रणवीरचा परफॉर्मेंस खूपच दमदार होता. (ipl 2022 closing ceremony special guest)
Vande Mataram ???????? @arrahman's magical performance will touch your hearts. #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/ixvjn9vlRT
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
रणवीरच्या परफॉर्मन्ससोबत एआर रहमान यांनीही परफॉर्म केला. त्यांच्यासोबत गायक मोहित चौहान (Mohit Chauhan) आणि नीती मोहन (Neeti Mohan) देखील उपस्थित आहेत. या तिघांनी मिळून मंचावर चार चाँद लावले. त्यांच्या गाण्यांनी स्टेडियमचे वातावरणच बदलून गेले. मोहित चौहानसोबत बेनी दयालही (Benny Dayal) स्टेजवर परफॉर्म करताना दिसला. विशेष म्हणजे, समारोप सोहळ्याला अनेक खास पाहुणे उपस्थित होते. बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि राजीव शुक्ला इ. मंडळी उपस्थित होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा