दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम संगीत जगतातील ज्येष्ठ गायक एडवा बशीर (Edava Basheer) यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध गायकाने वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे चाहतेच दु:खी नसून, मनोरंजन विश्वातही शोककळा पसरली आहे. अनेक चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज देणारे एडवा त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी ओळखले जातात. चकित करणारी बाब म्हणजे, एका कॉन्सर्टदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
गायक नुकतेच केरळमधील अलप्पुझा येथे ब्लू डायमंड ऑर्केस्ट्रा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यादरम्यान त्यांनी जे. येसुदासचे प्रसिद्ध गाणेही गायले. पण हे गाणे त्यांचे शेवटचे गाणे ठरेल, हे कोणास ठाऊक! स्टेजवर गाणे संपवताच ते बेशुद्ध झाले आणि त्यानंतर जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. (malayalam singer edava basheer suddenly fell unconscious in live concert died)
Singer Edava Basheer collapses on stage,dies pic.twitter.com/wxWbi2JTr0
— Bangla Hunt (@BanglaHunt) May 29, 2022
कार्यक्रमात एडवा बशीर येसुदास यांचे ‘माना हो तुम बहुत हसीना’ हे गाणे गात होते. गाण्याच्या शेवटी ते अचानक खाली पडले. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. काल (२८ मे) रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. गायकाच्या या लाइव्ह स्टेज परफॉर्मन्सचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये गायक गाणे गाल्यानंतर बेशुद्ध पडताना दिसत आहे.
विशेष म्हणजे एडवा बशीर हे संगीत जगतातील दिग्गज गायक होते. त्यांनी स्वाथी थिरुनल संगीत अकादमीमधून संगीताची शैक्षणिक पदवी घेतली होती. याशिवाय १९७२ मध्ये त्यांनी ‘कोल्लम संगीतालय गणमेळा मंडळी’ची स्थापना केली. एडवा यांनी ‘वीणा वैकुम’ या गाण्याद्वारे फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ते बघता बघता लोकांमध्ये लोकप्रिय झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा