Sunday, June 4, 2023

RIP | सुपरहिट गायकासोबतच एक उत्तम अभिनेता देखील होता सिद्धू मुसवाला, ‘या’ चित्रपटांमध्ये केलंय काम

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसवाला (Sidhu Moosewala) यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. गायक सिद्धू मूस वाला याने पंजाबी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट गाणी दिली. तो केवळ त्याच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी ओळखला जात नव्हता, तर तो एक उत्कृष्ट अभिनेता देखील होता. त्याने ‘मूसा जट’, येस आय ऍम स्टुडंट’ आणि ‘जट्ट दा मुकाबला’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले. (sidhu moosewala was with the superhit punjabi singer and the best actor)

मूसा जट (२०२१)
गुरिंदर डिंपी लिखित आणि रुपाली गुप्ता निर्मित ‘मूसा जट’ या चित्रपटात गायक सिद्धू मूसवाला मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री स्वीटाज बरार दिसली होती. हा एक ऍक्शन चित्रपट थ्रिलर होता.

येस आय ऍम स्टुडंट (२०२१)
सिद्धू मुसवाला याच्या ‘येस आय ऍम स्टुडंट’ या चित्रपटात एका विद्यार्थ्याची कथा दाखवण्यात आली होती. ज्याच्यासोबत कॅनडामध्ये प्रवासादरम्यान भेदभाव केला जातो. यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा