Monday, April 15, 2024

उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूर शिखरे पारंपारिक पद्धतीने करणार लग्न, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. सध्या सगळीकडे तिच्याच लग्नाची लगबग सुरु आहे.पारंपारीक मराठी पध्दतीने आयरा खान आणि नुपुर शिखरे लग्न करणार आहे. त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमानात व्हायरल होत आहे.

आयराने सोशल मीडीयावर केल्या पोस्ट
आयरा आणि नुपुर यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान अनेक पाहुणेमाडळी सुद्धा आली उदयपुरमध्ये दाखल झाली आहे.लग्नाच्या गडबडीतसुध्दा आयरा खान सोशल मीडीयावर ऍक्टीव दिसते. तिने आपले नवीन फोटो शेअर केले आहे.

एथनिक मध्ये दिसले आयरा,नुपुर
आयरा,नुपुर यांचे संगीत सेरेमनीचे फोटो समोर येत आहे. यामध्ये आयरा घागरा आणि नुपुर जीन्स आणि ब्लेजर मध्ये दिसतो आहे. यादोघांचा गेल्या वर्षात साखरपुडा झाला होता. त्यानंतर गेल्या वर्षीच त्यांनी लग्न रजिस्टर केेले होते. आणि आता पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत.

दीदी आयरासाठी आजाद गायला गाणे
संगीत कार्य़क्रमात आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आजाद दीदी आयरासाठी गाणे गातांना दिसला. ‘फुलों का तारें का सबका केहना हे…’ हे गाणं आजाद गायला. आमिर खान आणि किरण राव सुध्दा त्याच्या सोबत मंचावर दिसले. आमिर खान, किरण राव आणि आजादचा हा वीडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

नुपुरचा लुंगी डांस
नुपुर,आयराच्या संगीत कार्यक्रमातील अनेक वीडिओ समोर येत आहे. यातीलच एका वीडिओ मध्ये नुपुर लुंगी डांस यागाण्यावर थिरकतांना दिसतो आहे.उदयपुर मध्ये होणार आसलेल्या याविवाह सोहळ्यात आयरा आणि नुपुरने परिवाराससोबत खुप धमाल केली. आमिर खान, किरण राव आणि आजाद यांनी आयरासाठी खास डांस केला. कार्यक्रमाचे वीडीओ वायरल होत आहे.

उदयपुरमध्ये शाही लग्न
आयरा खान आणि नुपुर शिकरे ने ३ जानेवारी २०२४ला लग्न रजिस्टर केले होते. आता यानंतर हे दोघ पारंपरिक पध्दतीने उदयपुर मघ्ये लग्न करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासुन उदयपुर मध्ये लग्नाचे कार्यक्रम सुरु आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘अधिकृत घोषणेची वाट पाहा’, ‘टॉक्सिक’मध्ये यशसोबत काम करण्याच्या बातम्यांवर करीना कपूरने सोडले मौ
छावा सिनेमात विक्की कौशलबरोबर दिसणार ‘ही’ अभिनेत्री, साकारणार महाराणी येसुबाईंचं पात्र

हे देखील वाचा