Friday, July 5, 2024

दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने मोडला साखरपुडा, होणाऱ्या पतीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

पाकिस्तानी अभिनेत्री आणि ‘हिंदी मीडियम’ चित्रपटातील इरफान खानची सहअभिनेत्री सबा कमर लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार होती. पण आता तिने तिचा साखरपुडा मोडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री सबा कमरने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपला साखरपुडा मोडल्याबद्दल सांगितले आहे. सबाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “मी एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी अझीम खानसोबतचे माझे संबंध तोडत आहे. आता आम्ही लग्न करणार नाही. मी आशा करते की, आपण लोक नेहमीप्रमाणे माझ्या निर्णयाचे समर्थन कराल. मला तुम्हा सर्वांना हे सांगायचे आहे की, मी माझ्या आयुष्यात अझीम खानला कधीच भेटले नाही. आम्ही फक्त फोनद्वारे एकमेकांशी कनेक्ट झालो होतो. माझ्यासाठी ही एक कठीण वेळ आहे, परंतु ती देखील निघून जाईल. इंशा-अल्लाह. आपणा सर्वांना खूप प्रेम.”

सबाच्या या पोस्टवर आता अझीम खाननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिले की, “सबा तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात आणि जगाच्या सर्व आनंदाला आपण पात्र आहात. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला यश व प्रेम देईल. कधी कधी कठीण मार्गसुद्धा सुंदर ध्येयाच्या दिशेने नेतात आणि हो, मी या विभाजनाची संपूर्ण जबाबदारी घेतो.”

https://www.instagram.com/p/CNKKm6crb6v/?utm_source=ig_web_copy_link

काही काळापूर्वी अझीम खानवर गंभीर आरोप लागल्याने, तो चर्चेत आला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, अझीमवर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. असे म्हटले जाते की, त्यावेळी अझीमने एक व्हिडिओही शेअर केला होता, परंतु त्याने अल्पावधीत तो हटवला.

त्याचवेळी सबाबद्दल बोलायचे झाले, तर विशेष म्हणजे सबा कमर हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. सबाने पाकिस्तानी सिनेमाबरोबरच बॉलिवूडमध्येही आपली प्रतिभा दाखविली आहे. सबा बॉलिवूड चित्रपट ‘हिंदी मीडियम’ मध्ये दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत दिसली होती. सबा एका मुलाखतीत इरफानबद्दल म्हणाली होती की, त्याच्याकडून तिला बरेच काही शिकायला मिळाले. यासह बाकीच्या चाहते आणि कलाकारांप्रमाणेच, इरफानच्या मृत्यूची बातमी ऐकून सबाला देखील धक्का बसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

-‘आठ वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमानने मला फसवलं,’ ‘या’ अभिनेत्रीने केलाय गंभीर आरोप

हे देखील वाचा