बॉलिवूड जगतात असे अभिनेते होऊन गेले, ज्यांनी आपल्या आवाजाने आणि अगदी सरळ साध्या पण उत्त्तम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यातीलच एक अभिनेते म्हणजे इरफान खान. शुक्रवारी (०७ जानेवारी) इरफान खान यांची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त जाणून घेऊया, शेवटच्या वेळी ते आपल्या मुलासमोर नेमकं काय म्हणाले होते त्याबद्दल…
बाबिलने (Babil Khan) सांगितले की, इरफान खान (Irrfan Khan) यांना माहित झाले होते की, त्यांचा शेवट जवळ आला आहे. इरफान हे २ वर्षांपासून न्यूरो डोक्रीन ट्यूमरवर उपचार घेत होते, परंतु उपचारानंतरही ते बरे होऊ शकले नाही. २९ एप्रिल, २०२० रोजी इरफान यांनी जगाचा निरोप घेतला होता. इरफान यांचा मुलगा बाबिल खानने असा खुलासा केला होता की, जे वाचून तुम्हीही भावुक व्हाल. ते म्हणतात ना माणसाचा शेवट जवळ आला की, बऱ्याचदा त्याला जाणीव होत असते. तसेच काहीसे झाले, ते इरफान खान यांच्या बाबतीत.
बाबिलने नुकताच फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “वडिलांच्या मृत्यूच्या २-३ दिवस आधी मी हॉस्पिटलमध्ये होतो. ते आपले देहभान गमावताना दिसत होते, आणि शेवटची गोष्ट सांगताना त्यांनी प्रथम माझ्याकडे पाहिले, हसले आणि म्हणाले, ‘मी मरणार आहे.’ मी त्यांना म्हटले, नाही, तुम्हाला काहीही होणार नाही. ते पुन्हा हसले, आणि पुन्हा झोपले.”
मुलाखतीत हजर असलेल्या इरफान यांची पत्नी सुतापा यांनी इरफान यांची उत्तम गुणवत्ता सांगितली की, ते कधीही खोटे बोलत नसत. सुतापा म्हणाल्या, ‘त्यांचा उत्तम गुण असा होता की, ते तुमच्यावर रागावले असेल, किंवा त्यांनी तुमच्यावर प्रेम केले तरीही ते कधीही दिखावा करत नसत.’
बाबिल याला त्याच्या एका चाहत्याने प्रश्न केला की, आता तू वडिलांचे फोटो सोशल मीडियावर का नाही शेयर करत? त्याला उत्तर देत बाबिल म्हणाला की, ‘मी जेव्हापण वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होतो, तेव्हा मला काही लोक लिहितात की, मी स्वतःच्या प्रसिद्धीकरता हे सगळ करतो आहे. लोकांचे असे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले. त्यामुळे मी आता ठरवले आहे की, योग्य वेळ येत नाही तोवर मी काही शेअर करणार नाही.’
बाबिल लवकरच अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसमधून डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात बाबिलसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. बाबिलने नुकतेच चित्रपटाच्या पहिल्या वेळापत्रकांचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता इरफान यांचे चाहते बाबिलच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
इरफान खान यांच्या स्वभावामुळे त्यांनी चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. इरफान खान हे शुद्ध शाकाहारी जेवण करत असत. तसेच त्यांना मंदिरात जायला प्रचंड आवडत असे. ते खूपदा आपल्या कामाची सुरुवात मंदिरात जाऊन आल्यानंतरच करत असत.
हेही नक्की वाचा-
- शिक्षणासाठी इरफान यांना पैसे मिळणे झाले होते बंद, पण कधीच मानली नाही हार; वाचा त्यांची संघर्षमय कहाणी
- हॅपी बर्थडे दिलजीत! एकेकाळी गुरुद्वारामध्ये भजन, कीर्तन करणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बिग स्टार
- एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी रणबीर कपूर करतो ‘हे’ काम, ऐकून तुम्हीही व्हाल चकित
हेही पाहा-