Thursday, April 25, 2024

हॅपी बर्थडे दिलजीत! एकेकाळी गुरुद्वारामध्ये भजन, कीर्तन करणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बिग स्टार

बॉलिवूड आणि पंजाबी इंडस्ट्रीचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझचा आज वाढदिवस. दिलजीत पंजाबमधील अतिशय लोकप्रिय सिंगर आहे. सध्या दिलजीत कंगना राणावतसोबतच्या ट्विटर वॉरमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ शुक्रवारी (6 नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी

दिनांक 6 जानेवारी 1984 ला पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील दोसांझ कलां या गावात दिलजीतचा जन्म झाला. दिलजीतच्या वडिलांचे नाव बलबीर सिंग असून ते पंजाब रोडवेजचे निवृत्त अधिकारी आहेत. त्याच्या आईचे नाव सुखविंदर कौर आहे. दिलजीतला एक भाऊ आणि बहीण आहे. (diljit dosanjh birthday special, lets know about him)

लहानपनापासूनच दिलजीतला संगीताबद्दल विशेष प्रेम होते. अभ्यासासोबतच तो गाण्याचे देखील शिक्षण घेत होता. आज दिलजीतचा संगीताच्या जगात खूप मोठा बोलबाला आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात हाच दिलजीत गुरुद्वारामध्ये भजन, कीर्तन गात असे.]

दिलजीतचा पहिला अल्बम ‘इश्क दा उड़ा अड़ा’ 2004 साली आला. हा अल्बम बऱ्यापैकी लोकप्रिय झाला. त्यानंतर दिलजीतने दुसरा अल्बम काढला. मात्र, त्याला खरी लोकप्रियता टायच्या तिसऱ्या ‘स्माईल’ अल्बमने दिली. मग त्याने कधीच मागे वळून पहिले नाही.

त्यानंतर दिलजीतने 2009 साली यो यो हनी सिंह सोबत ‘गोलियां’ हे गाणे करत तो इंटरनॅशनल स्टार बनला. 2011साली दिलजीतने ‘द लायन ऑफ पंजाब’ या चित्रपटातून पंजाबी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्याच्या जट एंड जूलियट आणि जट एंड जूलियट 2 या दोन चित्रपटांनी पंजाबी चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड तोडले.

सन 2014 मध्ये दिलजीतने अनुराग सिंगच्या ‘पंजाब 1984’ चित्रपटात काम केले. त्यांच्या या सिनेमातील भूमिकेचे खूप कौतुक झाले. 2016 साली त्याने दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या ‘उडत पंजाब’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत हिंदी चित्रपटात पदार्पण केले. या भूमिकेसाठी आजीतला पदार्पणाच्या फिल्मफेयर आणि आयफा पुरस्कारही मिळाला.

त्यानंतर त्याने अनुष्का शर्माच्या ‘फिल्लोरी’ या सिनेमात काम केले, शिवाय माजी हॉकीपटू संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘सुरमा’ सिनेमात त्याने संदीप सिंगची भूमिका साकारली होती. 2019 साली त्याने अक्षय कुमार, करीना कपूर सोबत ‘गुड न्यूज’ सिनेमातही काम केले. २०२० मध्ये त्याचा ‘सूरज पे मंगल भारी’ सिनेमा प्रदर्शित झाला होता.

‘नचदी दे’, ‘भगत सिंह’,’ जट भूखदा फ‍िरे’, ‘गोलियां’, ‘सूरमा’, ‘सेल्फी’, ‘होला होला’, ‘पट‍ियाला पेग’, ‘इश्क हाज‍िर है’, ‘5 तारा’, ‘लैंबरगिनी’, ‘रात दी गेडी’ या गाण्यांनी दिलजीतला लोकप्रियता मिळाली. त्याने काही पंजाबी सिनेमातही काम केले ‘सरदार जी’, ‘अंबरसरिया’, ‘सरदार जी 2’, ‘सुपर सिंह’, ‘सज्जन सिंह रंगरूट’, ‘छाया-जो बसे सफल’ आदी हिट चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले, परिस्थितीने शाळा ही सोडावी लागली, पाहा ए. आर रहमान यांचा प्रेरणादायी प्रवास

हे देखील वाचा