काय सांगता! दीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट? लूज स्वेटर परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांकऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार


बॉलिवूड कलाकारांच्या बारीक- सारीक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मग ते त्यांच्या नवीन गाडीबद्दल असो, प्रेमप्रकरणाबद्दल असो, लग्नाबद्दल असो किंवा मग आई होण्याबद्दल. अनेकदा अभिनेत्रींचा लूक पाहून नेटकरी त्यांच्याबद्दल अनेक तर्क- वितर्क लावतानाही दिसतात. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणबाबत झाले आहे.

दीपिका पदुकोण दीर्घ काळानंतर शुक्रवारी (९ जुलै) मुंबईत स्पॉट करण्यात आले. दीपिकाला चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर पाहण्यात आले होते. तिने जसे पॅपराजींना पाहिलं, तेव्हा हात वर केला आणि ऑफिसमध्ये निघून गेली. यादरम्यान दीपिकाने नारंगी रंगाचा लूज स्वेटर आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केली होती. कोरोनामुळे तिने मास्कदेखील परिधान केला होता. अशामध्येच आता अभिनेत्रीचा हा लूक जोरदार चर्चेत आहे.

अभिनेत्रीचे चाहते तिच्या या लूकची चर्चा करत आहेतच. मात्र, तिच्या लूज स्वेटरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. लूज स्वेटर परिधान केल्यामुळे दीपिका प्रेग्नंट असल्याच्या अफवांनी जोर पकडला आहे. अनेक युजर्सने तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे की, ती प्रेग्नंट आहे का? (Is Actress Deepika Padukone Pregnant Netizens Asks As Actress Spotted In Loose Fit Clothes)

एका युजरने विचारले की, “बेबी बंप लपवण्यासाठी तिने लूज कपडे परिधान केले नाहीत ना?”

खरं तर, यापूर्वीही तिने कैरी खातानाचा व्हिडिओ शेअर केला होता. अशामध्ये अभिनेत्रीच्या एका चाहत्याने कमेंट करत ती प्रेग्नंट असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

तरीही, नुकतेच अभिनेत्रीच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात ती ऋतिक रोशनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याव्यतिरिक्त ‘पठाण’, ‘८३’ आणि हॉलिवूड ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्येही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.