Tuesday, June 18, 2024

करोडपती बिझनेसमॅनची पत्नी आहे ईशा कोप्पिकर, अभिनयाला राम राम ठोकून राजकारणात आजमावतेय हात

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पिकर तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. बऱ्याच चित्रपटात काम करून तिने चाहत्यांच्या मनात तिचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ईशा कोप्पिकरने २९ नोव्हेंबर २००९ रोजी व्यापारी टिम्मी नारंगशी लग्न केले होते. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात दोघांनी महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न केले होते. सोमवारी (२९ नोव्हेंबर) दोघांनी लग्नाचा बारावा वाढदिवस साजरा केला.

मुंबईत जन्मलेल्या ईशाने मॉडेलिंगद्वारे आपल्या करियरची सुरुवात केली. फोटोशूटमधून चर्चेत आल्यानंतर तिने १९९५ मध्ये मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, जिथे तिने मिस टॅलेंटचा मुकुट जिंकला. त्यानंतर तिने १९९८ मध्ये ‘चंद्रलेखा’ या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘फिझा’ या चित्रपटाद्वारे ईशाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केले. या चित्रपटात तिने करिश्मा कपूर आणि हृतिक रोशन यांच्यासोबत काम केले.

त्यानंतर ईशा ‘डरना माना है’, ‘कयामत’, ‘दिल का रिश्ता’, ‘पिंजर’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘कृष्णा कॉटेज’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. बॉलिवूडमध्ये १० वर्षे संघर्ष करूनही ईशाला फारसे यश काही मिळाले नाही. चित्रपटांमध्ये जास्त प्रसिद्धी न मिळाल्याने तिने स्टेज शो आणि व्हिडिओ अल्बममध्येही काम केले. तिने अनेक आयटम नंबर देखील केले जे अजूनही हिट आहेत. (isha koppikar and timmy narang mark their 12th wedding anniversary)

त्या दरम्यान ईशाचे नाव अभिनेता इंदर कुमारशी जोडले गेले होते. दोघे एकमेकांबद्दल खूप गंभीर होते. परंतु इंदरला दारूचे व्यसन होते, त्यामुळे तिने हे नाते पुढे नाही नेले. त्यानंतर बॉलिवूडपासून दूर गेलेल्या ईशाने हॉटेल इंडस्ट्रीतील उद्योगपती टिम्मी नारंग याच्याशी लग्न केले.

ईशा कोप्पिकर ही आज-काल चित्रपटापासून दूर आहे, पण अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपल्या पती आणि मुलीसह प्रवास करत राहते आणि सोशल साइटवर बरेच फोटो पोस्ट करते. शिवाय ईशा ही राजकारणात देखील सक्रिय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ती भाजपमध्ये दाखल झाली. त्याच बरोबर ईशा तिच्या पतीच्या व्यवसायातही त्याला साथ देते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा