Sunday, May 19, 2024

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलचे ब्रेकअप! इंस्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

‘बिग बॉस 17’ मधील सर्वात लोकप्रिय कपल समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांच्या ब्रेकअपच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. बिग बॉसच्या घरात, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलने अतिशय नाट्यमय पद्धतीने त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टी केली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासूनच त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा उडत होत्या. मात्र, यावर दोन्ही कलाकारांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता दावा केला जात आहे की दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

त्याचवेळी टीव्ही अभिनेता समर्थ जुरेलनेही एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे अफवांना आणखी उधाण आले आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, ‘तुझ्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे ते कायम राहील.’ समर्थच्या या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा या स्टार्सशी ब्रेकअपच्या अफवांवर बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांची भेट टीव्ही मालिका ‘उदारियां’च्या सेटवर झाली होती. या शोमध्ये अभिषेक कुमारही मुख्य भूमिकेत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा याआधी अभिषेकला डेट करत होती. बिग बॉस सीझन 17 मध्ये येण्यापूर्वी ईशा आणि अभिषेकचे ब्रेकअप झाले. शोमध्ये येताना समर्थने सांगितले की तो ईशाचा बॉयफ्रेंड आहे.

ईशा आणि समर्थ जुरेल यांच्या ब्रेकअपची अफवा यापूर्वीच पसरली होती. यावेळी या अफवांमध्ये कितपत तथ्य आहे हे पाहायचे आहे. मात्र, या दोन्ही स्टार्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

दिया बालनने ‘ॲनिमल’वर शेअर केले तिचे मत, रणबीर कपूरच्या चित्रपटाबद्दल दिले हे मोठे वक्तव्य
विवाहित पुरुषांसोबतच्या अफेअरबद्दल अरुणा इराणीने मांडले मत; म्हणाल्या…

हे देखील वाचा