बिग बॉसची सेकेंड रनर अप असणारी प्रियांका चहर अमाप लोकप्रिय झाली. तिला या शोने खूप मोठी ओळख मिळवून दिली. सोबतच मोठी फॅन फॉलोविंग देखील दिली. आज तिचे असंख्य चाहते आहेत. तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र आता तिच्याबद्दल एक वेगळी बातमी समोर येत आहे. मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएजेर असलेल्या इशिता गुप्ताने अभिनेत्री प्रियांका चहरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
इशिताने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत प्रियांकावर अनेक आरोप केले आहेत. इशिताने तिच्या पोस्टमधून प्रियांकावर तिचे कपडे चोरी करण्याचा आणि तिचा पाठलाग करण्याचा आरोप केला आहे. सोबतच प्रियांकाच्या पीआरवर देखील त्रास देण्याचा आरोप तिने केला आहे. हे सर्व तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये पोस्ट केले आहे.
View this post on Instagram
इशिता गुप्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून थेट प्रियांका चहर चौधरीला संबोधित करत एक व्यक्तव्य केले आहे. इशिताने प्रियंकाला ब्लॉक केले आहे. कारण प्रियंकाने तिची स्टाइल चोरत तिला स्टॉक केल्याचे इशिताने सांगितले आहे. एवढेच नाही तर इशिताने प्रियांकावर ३० हजार पाऊंडचे कपडे चोरल्याचा आरोप देखील केला आहे. एवढेच नाही तर प्रियंकाने तिला दुबई एयरपोर्टवर देखील त्रास दिला, कारण ती तिचे इमिग्रेशन लवकर करून बॉयफ्रेंडला भेटू शकते.
इशिताने तिच्या पोस्टमध्ये बिग बॉसमध्ये तिला घेतल्यामुळे निर्मात्यांवर आणि सलमान खानवर देखील निशाणा साधला आहे. प्रियांकावर बिग बॉसमध्ये केवळ यामुळे लक्ष दिले गेले कारण ती चॅनेलच्या परिवाराचा भाग होती. प्रियांकाचा पीआर असलेल्या ‘मॅरीड कपल’वर देखील इशिताने आरोप केले आहेत. इशिताने तिच्या पोस्टमधून कायदेशीर कारवाईची धमकी देखील दिली आहे. मात्र अजून यावर प्रियांकाकडून कोणतेच उत्तर आलेले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो