Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड ‘ए मेरे वतन के लोगों…’, गानकोकिळा लता मंगेशकर यांना ITBP कॉन्स्टेबलने ‘अशी’ दिली श्रद्धांजली, ओलावतील डोळे

‘ए मेरे वतन के लोगों…’, गानकोकिळा लता मंगेशकर यांना ITBP कॉन्स्टेबलने ‘अशी’ दिली श्रद्धांजली, ओलावतील डोळे

‘ए मेरे वतन के लोगों’ आज सुद्धा ती मधुर चाल आणि तो कोमल आवाज कानावर पडतो आणि डोळ्यापुढे उभ्या राहतात त्या भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar). वयाच्या ९२व्या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी लताजींनी जगाचा निरोप घेतला. लताजींची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांनी देशासाठी गायलेलं गाणं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं देशभरात इतकं प्रसिद्ध आहे की, ऐकूनच प्रत्येक भारतीय त्यात हरवून जातो. या गाण्याची प्रत्येक ओळ ऐकून डोळे ओलावले नसतील, अशी व्यक्ती देशात क्वचितच असेल.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा त्यांचेही डोळे ओले झाले होते. या गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आयटीबीपीचा जवान भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या शैलीत श्रद्धांजली अर्पण करत आहे. (itbp constable pays tribute to swar kokila bharat ratna lata mangeshkar)

व्हिडीओमध्ये तुम्ही आयटीबीपीचे जवान ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्यावर सॅक्सोफोन वाजवून लता मंगेशकर यांना एका नेत्रदीपक, अनोख्या शैलीत आदरांजली वाहताना पाहू शकता, जवानाचे नाव मुझम्माल हक असून ते आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचा हा अप्रतिम व्हिडीओ आयटीबीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे आणि खाली कॅप्शन लिहिले की, “ए मेरे वतन के लोगों… कॉन्स्टेबल मुझुम्मल हक, आयटीबीपी यांनी स्वरकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर याना भावपूर्ण श्रद्धांजली.” अवघ्या २ मिनिटे १९ सेकंदाच्या या व्हिडिओने प्रेक्षकांची मने जिंकले आहेत.

कवी प्रदीप यांनी ‘ए मेरे वतन के लोगों…’ हे गाणे लिहिले आहे ते कदाचित तुम्हाला माहित असेल. या गाण्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे. असे म्हणतात की, जेव्हा लता मंगेशकर यांनी प्रदीपचे हे गाणे ऐकले तेव्हा त्या रडू लागल्या आणि त्यांनी या गाण्याला आवाज दिला, तेव्हा ते ऐकून संपूर्ण देश रडला.

हेही वाचा :

हे देखील वाचा