Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड जान कुमार सानू सिद्धार्थ शुक्लाला देणार ट्रिब्यूट? नवीन गाण्याची घोषणा करताच ट्रोलर्सने साधला निशाणा

जान कुमार सानू सिद्धार्थ शुक्लाला देणार ट्रिब्यूट? नवीन गाण्याची घोषणा करताच ट्रोलर्सने साधला निशाणा

गायक जान कुमार सानू ‘बिग बॉस’ फेम दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल यांच्या नात्यावर एक गाणे बनवणार आहे. ‘मेरा तू’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे दिवंगत सिद्धार्थ शुक्लाला त्याच्याकडून ट्रिब्यूट असेल. अलीकडेच शहनाझ गिलने तिचा जवळचा मित्र सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘तू यही है’ हे गाणे लाँच केले. यानंतर आता जान कुमारने सिडनाझला ट्रिब्यूट करणार असल्याचे, त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले होते. यामुळे आता तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

जान कुमार सानूने आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “‘मेरा तू’ दिवाळीनंतर प्रदर्शित होईल. हॅशटॅग सिडनाझ.” या ट्वीटवर युजर्सने प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्याच्या ट्रिब्यूटच्या प्रकरणात तो सिद्धार्थची लीगेसी संपवणार असल्याचे अनेकांनी सांगितले. एका युजरने लिहिले की, “आपण जान कुमार सानूला त्याच्या ‘बिग बॉस १४’च्या प्रवासासाठी ट्रिब्यूट दिले पाहिजे आणि त्यात निक्की तांबोळीले केलेल्या सर्व अपमानाचा समावेश केला पाहिजे आणि ज्याप्रकारे त्याच्या वडिलांनी त्याला टीव्हीवर नाकारले होते. त्यावेळी मला त्याचे वाईट वाटले पण तो या सर्वासाठी पात्र आहे.”

या ट्वीटवर जान कुमारने उत्तर दिले की, “लवकर कर भाऊ, मी तुझ्या घाणेरड्या विचारसरणीला प्रोत्साहन करेल.” यानंतर ट्विटर युजरने लिहिले की, “सिद्धार्थसाठी ट्रिब्यूट करायला हवे, तो आता आमच्यासोबत नाही, पण फक्त काही फॉलोअर्ससाठी तुम्ही त्याच्या लीगेसीचा अपमान करत आहात. त्यामुळे कोणाची वाईट विचारसरणी आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. हे देखील कोट करून उत्तर दे, जानू.”

जान कुमार सानू युजरच्या ट्वीटला उत्तर देत म्हणाला की, तो गायक आहे आणि केवळ गाण्यानेच त्याला श्रद्धांजली वाहता येईल आणि हा त्याच्या लीगेसीचा अपमान कसा म्हणता येईल. त्याने लिहिले की, “त्याला आणि शहनाझला गाणे समर्पित करून त्याच्या लीगेसीचा अपमान? भाऊ, मी एक गायक आहे, ज्याला मी आदर्श मानतो त्याच्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी मी डान्स करावा किंवा अभिनय करावा असे तुला वाटते? हा त्याच्या लीगेसीचा अपमान आहे का? मला वाटते तुम्हाला मदत हवी आहे. असो, तुमच्यासाठी पुरेसे फुटेज. रविवारचा आनंद घे.”

जानने नंतर खुलासा केला की ‘तू मेरा’ गाणे हा म्युझिक व्हिडिओ नसेल. “फक्त स्पष्ट करत, हा ‘म्युझिक व्हिडिओ’ असणार नाही. मला सिद्धार्थ आणि शहनाझमधील बॉन्डिंग खूप आवडले, मी नुकतेच एक गाणे लिहिले आणि गायले आहे.” ‘तू यहीं है’ या गाण्यामुळे देखील शहनाझ गिलला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्या दिव्याने केला बॉयफ्रेंड वरुणसोबतच्या वेडिंग प्लॅनचा खुलासा, म्हणाली…

-‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’चा किताब जिंकून घरी परतली दिव्या; बॉयफ्रेंड वरुणने खास अंदाजात केले स्वागत

हे देखील वाचा