जॅकी श्रॉफ (Jackie Shroff )हे हिंदी चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि अनोख्या स्टाईलने त्यांनी चित्रपट जगतात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 80-90 च्या दशकात त्यांच्या चित्रपटांची आजही सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. आपल्या अभिनय कारकिर्दित त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले होते. त्यांच्या कर्मा’, ‘जवाब हम देंगे’, ‘काश’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘मैं तेरा दुश्मन’, ‘रंगीला’ या गाजलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांची चांगलेच मनोरंजन केले. जॅकी श्रॉफ यांच्या चित्रपटांइतकीच त्यांची खरी लवस्टोरीही भन्नाट आहे.
जॅकी आणि आयेशा यांचीपहिली भेट खूपच मजेशीर आहे. जेव्हा अभिनेते जॅकी श्रॉफ पहिल्यांदा आयेशाला भेटले तेव्हा आयेशा फक्त 13 वर्षांची होती. एकदा जॅकी श्रॉफ रस्त्याच्या कडेले उभे होते आणि फक्त 13 वर्षांची आयेशा शाळेचा गणवेश घालून बसमध्ये बसली होती. आयेशाला बघून जॅकीचे मन हरखून गेले होते. यानंतर जॅकी आयेशाला एका रेकॉर्डिंग स्टोअरमध्ये भेटले. येथे जॅकीने आयशाला तिचा म्युझिक अल्बम खरेदी करण्यास मदत केली. या भेटीनंतरच आयशाही जॅकी श्रॉफ यांना पसंद करू लागली.
जॅकी श्रॉफ आणि आयेशा खुप कमी वेळात एकमेकांच्या प्रेमात पडले होते पण दोघांची प्रेमकहाणी इतकी साधी नव्हती कारण जॅकीने आयेशाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होते एवढेच नाही तर दोघेही लवकरच लग्न करणार होते. अशा परिस्थितीत जॅकीलाही त्या मुलीचा विश्वास तोडायचा नव्हता आणि त्यांनी आपल्या मैत्रिणीबद्दलची सर्व कथा आयेशाला सांगितली.
आयेशा जॅकी श्रॉफ यांच्यावर खूप प्रेम करत होती आणि याच कारणासाठी तिने जॅकीच्या परवानगीने तिच्या मैत्रिणीला पत्र लिहिले होते. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत या पत्राबद्दल सांगितले होते. या पत्रात तिने तू परत का येत नाहीस? आपण जॅकीशी लग्न करू आणि बहिणींप्रमाणे एकत्र राहू. जॅकी श्रॉफ यांनी सांगितले की जर असे असते तर आज मला दोन बायका असत्या. दरम्यान आयेशा आणि जॅकी श्रॉफ यांनी 5 जून 1987 मध्ये विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.(jackie shroff ayesha shroff wedding anniversary know their interesting love story)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल पाच वर्षांनी दीपिका पदुकोणचा सिनेमा झाला हिट, भावनिक होत म्हटले शाहरुखला धन्यवाद
जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ