Monday, July 1, 2024

अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा PETAकडून सन्मान, पुरस्कार मिळाल्यावर अभिनेते भावूक

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ते सतत कोँणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. जॅकी श्रॉफ यांना PETA कडून ‘मोस्ट ब्युटीफुल व्हेजिटेरियन सेलेब्रिटी’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार शाकाहारी जीवनशैलीचे पालन करणाऱ्या सर्वात सुंदर सेलिब्रिटीला दिला जातो.

जॅकी श्रॉफ हे शाकाहारी जीवनशैलीचे दीर्घकाळचे समर्थक आहेत. ते अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रोपटे देखील देतात. PETA ने जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या शाकाहारी जीवनशैली, पर्यावरणप्रेम आणि समाजसेवेसाठी हा पुरस्कार दिला आहे.

पुरस्कार स्वीकारताना जॅकी श्रॉफ म्हणाले, “या पुरस्कारासाठी मी PETA इंडियाचा खूप आभारी आहे. मला नेहमीच निरोगी जीवनशैली पाळणे आवडते आणि शाकाहार हा एक निरोगी पर्याय आहे. याबद्दल अशी पावती मिळाल्याने मला खूप आनंद झाला. मी नेहमी म्हणतो की, आपण या जगाला आलो तेव्हा जसे होते त्यापेक्षा चांगले करायला हवे. हा पुरस्कार म्हणजे मी योग्य मार्गावर आहे हे स्पष्ट करते.”

जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते केवळ अभिनयासाठीच नाही तर आपल्या समाजसेवेसाठी देखील ओळखले जातात. जगभरातील शाकाहारी सेलिब्रिटींच्या यादीत प्रथम स्थान पटकावून त्यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

या पुरस्कारासाठी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अनुष्का शर्मा आणि जॉन अब्राहम या दोन अभिनेत्यांची नावे देखील चर्चेत होती. मात्र, शेवटी जॅकी श्रॉफ यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला. (Jackie Shroff has been awarded Most Beautiful Vegetarian Celebrity by PETA)

आधिक वाचा-
‘मिर्झापूर’मध्ये अत्यंत सोज्वळ दिसणारी ‘कालीन भैय्या’ची सून खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, पाहून चाहतेही फिदा
‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: ज्योतिराव-सावित्रीमाईंच्या संघर्षमय गाथेची झलक पाहाच

हे देखील वाचा