Sunday, January 12, 2025
Home टेलिव्हिजन Romance | जॅकी श्रॉफ पुन्हा आले ‘राम लखन’च्या अवतारात, डिंपल बनलेल्या शिल्पा शेट्टीनेही दिली त्यांना साथ

Romance | जॅकी श्रॉफ पुन्हा आले ‘राम लखन’च्या अवतारात, डिंपल बनलेल्या शिल्पा शेट्टीनेही दिली त्यांना साथ

‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’ या रियॅलिटी शोमध्ये हा आठवडा जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) स्पेशल असणार आहे. या शोमध्ये जॅकी श्रॉफ खास पाहुणे म्हणून उपस्थिती लावणार आहेत, ज्यांच्यासोबत स्पर्धक खूप मस्ती करताना दिसणार आहेत. या शोमध्ये जॅकी ‘देवदास’मधील चुन्नीलाल बनून येतील. स्पर्धकांसोबत मस्ती करण्यासोबतच, ते शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty) त्यांच्या गाण्यावर डान्स करताना देखील दिसतील. खरं तर शिल्पा शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांच्या डान्सची मागणी जज आणि रॅपर बादशाहने (Badshah) केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बादशाहची डिमांड
चॅनलने या शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये बादशाह त्याची मागणी होस्ट अर्जुन बिजलानीला सांगताना दिसत आहे. तो अर्जुनला सांगतो की “यार, मला देजावू होत आहे. स्टेजवर जॅकी दादा आणि शिल्पा एका गाण्यावर डान्स करत असल्याचं घडतंय. मला स्पष्ट दिसत नाहीये.” अर्जुन म्हणतो, “हे माझ्यासोबतही घडत आहे.” त्यानंतर अर्जुन म्हणतो की, हे जर प्रत्येकाच्या बाबतीत घडत असेल तर त्यांच्याबाबतीतही घडले पाहिजे. (jackie shroff romance with shilpa shetty on ram lakhan song tujhe yaad kia indias got talent)

शिल्पा शेट्टी आणि जॅकी श्रॉफने केला डान्स
शिल्पा शेट्टी आणि जॅकी श्रॉफ ‘राम लखन’ चित्रपटातील ‘तेरा नाम लिया तुझे याद किया’ या गाण्यावर स्टेजवर परफॉर्म करतात. जॅकी श्रॉफ त्यांच्या राम लखन अवतारात येतात. त्यानंतर दोघेही स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसतात.

किरण खेर यांनीही धरला ठेका!
जॅकी श्रॉफ स्पेशल आठवड्यात कोणताच जज थिरकल्याशिवाय राहणार नाही. तसेच, शोमध्ये डिमॉलिशन क्रू ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे. ते पाहून सर्वांनाच धक्का बसेल. स्वत: जज किरण खेरही त्यांच्यासोबत स्टेजवर हे गाणे सादर करणार आहेत. तसेच त्या त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करतानाही दिसतील.

हेही वाचा :

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा