×

परदेश दौऱ्यासाठी जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीच्या कोर्टात दाखल केला अर्ज, मनी लॉन्ड्रींग प्रकरणात देश सोडण्यास आहे पाबंदी

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस सध्या इडीच्या रडारवर आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु असल्याने तिच्या परदेश दौऱ्यांवर बंधनं लादण्यात आली आहे. आता या प्रकरणात जॅकलिनने दिल्लीमधील एका कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे. तिला अबूधाबीमध्ये होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्यांमध्ये सामील होण्यासाठी १५ दिवसांच्या परदेशी प्रवासातही परवानगी मागितली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

तत्पूर्वी जॅकलिन फर्नांडिसचे नाव २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात समोर आले होते, त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास करताना जॅकलिनची ७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय जॅकलिनच्या विरोधात ईडीने एक एक सर्क्युलर जारी करताना तिच्या परदेश प्रवासावर रोख लावली आहे. मात्र आता तिला १५ दिवसांसाठी अबुधाबी, फ्रांस, नेपाळ प्रवास करायचा आहे. यासाठी तिने कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात मागच्यावर्षी जॅकलिन फर्नांडिसला मुंबई एयरपोर्टवर सेक्युरिटी चेकिंगमध्ये थांबवले होते. तिला काही काळ अटक देखील करण्यात आली नंतर तिला सोडण्यात आले होते.

ईडीच्या तपासात समोर आले की, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या ज्याची किंमत जवळपास ५ कोटी होती. यासाठीच ईडीने जॅकलिनची ७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. आता जॅकलिनला १५ दिवसांसाठी परदेश दौऱ्यासाठी परवानगी मिळते की नाही हे बघणे महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post