जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कोट्याधीश ठग असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे जॅकलिन ८ डिसेंबरला ईडी समोर उपस्थित राहणार असून, या प्रकरणातील मोठी साक्षिदार म्हणून ती तिचा जबाब नोंदवणार आहे. याआधी देखील ईडीने जॅकलिनची चौकशी केली आहे.
एका मोठ्या वेबसाईटच्या वृत्तानुसार जॅकलिनची चौकशी आणि तिची चौकशी दिल्ली येथील MTNL भवन येथे असणाऱ्या ईडीच्या कार्यालयात होणार आहे. ईडीच्या पाच अधिकाऱ्यांसोबत एका महिला अधिकारी अशा सहा लोकांसमोर जॅकलिन तिचा जबाब नोंदवणार आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी (५ डिसेंबर) रोजी संध्याकाळी मुंबई विमानतळावर परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले होते. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती परदेशात जात होती. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिला रोखण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) त्याच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करत तिची अनेक तास चौकशी केल्यानंतर तिला सोडून दिले होते.
ईडीच्या असे सांगणे आहे की, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन ही महत्त्वाची साक्षीदार आहे. जॅकलिन सुकेशची गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जात असून तिने जॅकलिनला अनेक महागडे गिफ्ट्सही दिले आहेत. एका माहितीनुसार चंद्रशेखरने त्याच्या चौकशीदरम्यान सांगितले की त्याने जॅकलिनला ५२ लाख रुपये किमतीचा घोडा आणि ३६ लाख रुपयांच्या चार पर्शियन मांजरी देखील दिल्या आहेत. ईडीने ऑगस्टमध्ये जॅकलिनचीही चौकशी केली होती.
ईडीने ६ डिसेंबरला पुन्हा एकदा तपास आणि चौकशीसाठी जॅकलिनला समन पाठवले. शनिवार (४ दिसंबर) ला PMLA अधिनियमाच्या अंतर्गत एक चार्टशीट जमा केली असून, यात बॉलिवूडमधील जॅकलिनसोबतच अनेक कलाकारांना साक्षीदार म्हणून नॉमिनेट केले आहे.
हेही वाचा-