Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड मल्लिका शेरावतचा हॉट अंदाज पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके; तर नेसलेल्या साडीमुळे झाली ट्रोल

मल्लिका शेरावतचा हॉट अंदाज पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके; तर नेसलेल्या साडीमुळे झाली ट्रोल

अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु मल्लिका सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. मल्लिकाला तिच्या बोल्ड स्टाईलमुळे लोक ओळखतात. मोठ्या पडद्यावर तिने ‘मर्डर’सह अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. असे असूनही मल्लिका बऱ्याच काळापासून पडद्यापासून गायब होती, पण आता ती पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. यावेळी ती मोठ्या पडद्यावर नाही, तर छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

सोशल मीडियावर दिली माहिती
अभिनेत्री मल्लिका शेरावतने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली. मल्लिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती स्वतःच्या ‘जलेबी बेबी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मल्लिका शेरावत पहिल्यांदा साध्या ड्रेसमध्ये आणि नंतर निळ्या साडीत आहे. या दोन्ही ड्रेसमध्ये मल्लिका खूप सुंदर दिसत आहे. मल्लिका फक्त रुपेरी पडद्यापासून दूर नाही, तर ती भारतामध्येही नव्हती. मल्लिका लॉस एंजेलिसमध्ये राहत होती.आता पुन्हा एकदा ती भारतात परतली आहे.

या शोमध्ये दिसणार मल्लिका
मल्लिकाने तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, ‘शूट चालू झाले.’

खरं तर मल्लिका एका कॉमेडी शोची परीक्षक असणार आहे. यासाठी ती भारतात परतली आहे. जेव्हा मल्लिका तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आली, तेव्हा ती पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. मल्लिका यावेळी साडीमध्ये दिसली होती. काही लोकांना तिचा हा अंदाज आवडला, तर काही लोकांनी तिला या कपड्यांमुळे ट्रोल केले.

सोशल मीडियावर झाली ट्रोल
काही लोकांना मल्लिकाची साडी अजिबात समजली नाही. याचबद्दल एका युजरने लिहिले की, “साडीसारखा सुंदर पोशाख पूर्णपणे खराब केला.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “फॅशनच्या नावावर काहीही होते.” आणखी एकाने लिहिले की, “कृपया साडी एकटं सोड.” काही युजर्सनी असेही म्हटले की, “कृपया याला साडी म्हणू नका.”

सोशल मीडियावर दाखवते बोल्ड अंदाज
मल्लिका भलेही चित्रपटांपासून दूर असेल, पण तिचा बोल्ड अंदाज अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. मल्लिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झीनत’ चित्रपटात दिसली होती. २०१९ मध्ये, मल्लिका हॉरर कॉमेडी वेब सिरीज ‘बू सबकी फटेगी’ मध्ये दिसली होती.

मल्लिका शेरावत राहते परदेशात
अभिनेत्री मल्लिका शेरावत भारतात कमी आणि परदेशात जास्त राहते. मल्लिकाचा कॅलिफोर्नियातील बेवर्ली हिल्स येथे एक आलिशान बंगला आहे. तिने अलीकडेच तिच्या बंगल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जिथे ती चाहत्यांना तिच्या व्हिलाच्या स्विमिंग पूल आणि भव्य बागेची झलक दाखवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जाळ अन् धूर संगटच! राखी सावंतने ‘कमरिया लचके रे’ गाण्यावर लावले ठुमके; व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

हे देखील वाचा