बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकामध्ये अनेक चित्रपट आहेत जे खूपच गाजले होते. त्यापैकीच ‘जमाई राजा’ हा चित्रपट 1990 साली प्रदर्शित झाला असून खूपच गाजला होता. अनेकांनी हा चित्रपट पाहिलाच असेल. यामध्ये मुख्या भूमिकेत अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित हे कलाकार होते. त्यासोबतच हेमा मालिनी याही मुख्या भुमिकेत पाहाया मिळाल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. माहीतीनुसार पुन्हा एकदा या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत.
‘जमाई राजा’ या चित्रपटाला 32 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मात्याने याचा रिमेक बनवण्याचा विचार केला आहे. यामध्ये अनिल आणि माधुरीच्या जोडीला चाहत्यांनी खूपच पसंदी दर्शवली होती. आता जर या चित्रपटाचा रिमेक बनत असेल तर कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असतील हे पाहणे खूपच रंजक ठरेल. हा चित्रपट शेमारु प्रोडक्शनमध्ये तयार झाला असून इंडियन प्रोडक्शन हाउस शेमारु इंटरटेनमेंटने इंडिया मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्कसोबत करार केला आहे. शेमारु हे भारतातील सगळ्यात जुनी मनोरंजन कंपनी आहे. या प्रोडक्शनने 400 पेक्षाही जास्त चित्रपट बनवले आहेत.
‘जमाई राजा’ हा चित्रपट तेलुगू ‘अट्टाकू यामुदु अम्मयिकी मोगुदू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला होता. याची स्टोरी जावई आणि सासूवर अवलंबून होती. हा एक कौटुंबिक चित्रपट होता जो खूपच प्रसिद्ध झाला होता. त्याचवर्षी या चित्रपटाचे तमिळमध्ये ‘मप्पीलाइ’ या नावाने रिमेक बनवला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता रजनीकांत (Rajnikant) यांनी मुख्य भूमिका निभावली होती. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला तेव्हा या चित्रपटामध्ये रजनीकांत यांचा जावई धनुष (Dhanush) याला मुख्य भूमिकेत घेतले होते.
आता हिंदी चित्रपटामध्येही ‘जमाई राजा’ चित्रपटाचा दुसरा भाग बनवणार असल्याचे ठरवले आहे. हा 90 च्या दशकातील अतिशय गाजलेला चित्रपट होता. यामध्ये मुख्य भूमिकेमधील कलाकारही खूप गाजले होते. आता दुसऱ्या भागात कोणते कलाकार मुख्य भूमिका कोण असेल याची प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला ‘या’ मोठ मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी, जाणून घ्या पूर्ण माहिती
शालिनच्या वर्तवणुकीमुळे टीनाचा उडाला विश्वास; म्हणाली, ‘तो डबल गेम…’