रजनीकांत यांची थोरली मुलगीही आहे त्यांच्यासारखीच टॅलेंटेड, ‘या’ चित्रपटांच केलंय दिग्दर्शन

दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती एवढ्या मोठ्या अभनेत्याची मुलगी असूनही तिने तिच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिच्या वडिलांसारखी हुशार आणि गुणी आहे. आज (दि. 20 सप्टेंबर) दिवशी सौंदर्या तिचा वाढदिवस साजरी करत आहे. आज या खास दिवशी तिच्या आयुष्यातील काही खास माहिती जाणून घेऊया.

सौंदर्या रजनीकांत(Saundarya Rajanikanth)  हिचा जन्म 1984 मध्ये झाला होता. ती आज आपला 38 वा जन्मदिवस साजरी करत आहे. ती अभिनेता रजनीकांत(Rajinikanth) आणि लता रजनीकांत (Latha Rajinikanth) यांची धाकटी मुलगी असून, त्यांची एक थोरली मुलगी ऐश्वर्या रजनीकांत(Aishwarya Rajinikanth) आहे. सौंदर्या आपल्या वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असते. सौंदर्याने सुरुवातीचे शिक्षण चेन्नईच्या आश्रम मैट्रिकुलेशन हायर स्कूलमधून केले होते. तिने 3 सप्टेंबर 2010 रोजी उद्योगपती अश्विन राजकुमार याच्याशी विवाह केला. यानंतर 2015 साली तिने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव वेद आहे. मात्र, या हे लग्नामध्ये मतभेद होत असल्यामुळे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट होऊन दोन वर्षानंतर सौंदर्याने अभिनेता आणि व्यावसायिक विशगन वनगमुंडी याच्यासोबत दुसरा विवाह केला. हा विवाह 11 फेब्रुरवारी 2019 रोजी चेन्नईच्या लीला पॅलेसमध्ये पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soundarya Rajinikanth (@soundaryaarajinikant)

सौंदर्याच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, सौंदर्या चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. तिने थ्रीडी एनिमेटेड ‘सुल्तान’ या चित्रपटामधून निर्देशनाची सुरुवात केली होती मात्र, रजनीकांत स्टारर हा चित्रपट बनू नाही शकला. यानंतर तिने भारताचा पहिला मोशन कॅप्चर चित्रपट ‘कोचादाइयां’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केले, या चित्रपटांमध्येही तिचे वडिल हेच मुख्य भुमिकेत होते. 2016 साली तिने धनुष (Dhanush), काजल अग्रवाल(kajal aggarwal )आणि मंजिमा मोहन(manjima mohan) यांच्यासोबत ‘निलवुक्कु एनमेल एन्नाडी कोबम’ या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर काम सुरु केले मात्र, या चित्रपटाचेही काम बंद झाले

यानंतर तिने ‘वेलैइल्ला पट्टाधारी2’ या चित्रपटाचे निर्देशन केले असून हा चित्रपट तेलुगू भाषामध्ये शूट केला होता. 2019 सालामध्ये तिने ‘मई 6 एंटरटेनमेंट’ नावाची प्रोडक्शन कंपनी सुरु केली. सौंदर्या एवढेच करुन थांबली नाही तर तिने ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हूटे’ याची स्थापना केली जो वॉयस मेसेजवर आधारित आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
कोणतेही काम करण्याआधी अध्यात्मिक गुरूंची ‘हे’ कलाकार घेतात परवानगी, ऐश्वर्याने तर प्रेम करतानाही…‘सज्जन सिंग’ बनून अनुपम श्याम यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, अंतिम क्षणी केलाय आर्थिक तंगीचा सामना‘त्या’ रात्री महेश भट्ट यांना समजवण्यासाठी परवीन बाबी चक्क नग्नावस्थेत धावल्या होत्या रस्त्यावर

 

 

 

 

Latest Post