Friday, January 30, 2026
Home अन्य दु:खद | प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा!

दु:खद | प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा!

जगप्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांच्या निधनातून कलाप्रेमी अजून सावरले नाहीत, तोच त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी (Pandit Bhajan Sopori) यांचेही गुरुवारी (२ जून) संध्याकाळी गुरुग्राम रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १९४८ साली श्रीनगर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भजनलाल सोपोरी असून, त्यांचे वडील पंडित एस एन सोपोरी हे देखील संतूर वादक होते.

भजन सोपोरी यांना संतूरचे ज्ञान त्यांचे आजोबा एस सी सोपोरी आणि वडील एस एन सोपोरी यांच्याकडून मिळाले. आजोबा आणि वडिलांकडूनच त्यांचे गायन शैली आणि वादन शैलीचे शिक्षण मिळाले. तसेच, भजन सोपोरी यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली होती. यानंतर त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही शिक्षण घेतले. (jammu noted santoor player pandit bhajan sopori passes away)

पंडित भजन सोपोरी यांचे योगदान
काश्मीर विभागातील श्रीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पंडित भजन सोपोरी हे सुफियाना घराण्याचे आहेत. त्यांचे आजोबा व वडील संतूर वादनात निपुण असल्याने, त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पंडित भजन सोपोरी यांनी केले. पंडित भजन सोपोरी यांनी ‘नट योगा ऑन संतून’ हा अल्बम बनवला. एवढेच नाही, तर पंडित भजन सोपोरी हे सोपोरी अकादमी फॉर म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्टचे संस्थापक आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रसार करणे, हा या अकादमीचा मुख्य उद्देश आहे.

पंडित भजन सोपोरी यांच्या जीवनकाळावर नजर टाकली, तर ते भारतातील एकमेव शास्त्रीय संगीतकार आहेत ज्यांनी संस्कृत, अरबी, फारसीसह देशातील जवळपास सर्व भाषांमध्ये चार हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा