×

संगीत क्षेत्राच्या प्रेमासाठी शिवकुमार शर्मा यांनी धुडकावली होती बिग बींसोबत अभिनय करण्याची ऑफर

जगप्रसिद्ध संतूर वादक आणि संगीतकार  शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांच्या निधनाने संपूर्ण सिने जगताला मोठा धक्का बसला आहे. आपल्या जादूई आवाजाने आणि वादनाने त्यांनी अनेक वर्ष संगीत क्षेत्रात आपले अनमोल योगदान दिले होते. मंगळवार (१० मे, २०२२) ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आणि ह्रदयाच्या समस्येशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही लढत अपयशी ठरली. जाणून घेऊ या त्यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्सा. 

पंडित शिवकुमार शर्मा हे संतूरवादक म्हणून जगभरात प्रसिद्ध होते. सोबतच त्यांनी बॉलिवूड जगतातील अनेक गाण्यांना संगीत दिले होते. मात्र खूप जणांना मााहित नाही की, संतूरवादक शिवकुमार यांना एका चित्रपटात अभिनय करण्याचीही ऑफर आली होती. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली होती. या संपूर्ण घटनेचा खुलासा खुद्द शिवकुमार शर्मा यांनीच एका मुलाखतीत बोलताना सांगितला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट महानायक अमिताभ बच्चन यांचा पहिलाच चित्रपट होता.

या मुलाखतीत बोलताना शिवकुमार यांनी सांगितले की “हा संपूर्ण किस्सा ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटाच्या सेटवर झाला होता. ज्यावेळी मी संगीतकार अहमद अब्बासला गाण्याचे सीन समजावून सांगत होतो. यावेळी त्यांनी मला एका बाजूला बोलावले. तेव्हा मला वाटले की काहितरी काम असेल परंतु त्यांनी मला थेट या चित्रपटात अभिनेता  म्हणून काम करणार का असे विचारले. सोबतच दिसायलाही छान आहेस, बोलतोस सुद्धा छान म्हणत माझे कौतुकही केले. मात्र मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार देत मला फक्त संगीत क्षेत्रात काम करायचे आहे” असे सांगितले.

दरम्यान पंडित शिवकुमार यांनी नाकारलेला हा चित्रपट महानायक अमिताभ बच्चन यांचा पहिलाच चित्रपट होता. मात्र माझे पहिले प्रेम संगीतचं आहे असे म्हणत त्यांनी थेट शब्दात नकार दिला. त्यांचे संगीत जगतातील कार्यही तितकेच महान आहे. त्यांनी हरिप्रसाद चौरासिया यांच्यासोबत अनेक बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिले. या दोघांची जोडी शिव-हरी म्हणूनच सिने जगतात प्रसिद्ध होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post