जमशेदपूरच्या गोलमुरीचा रहिवासी असलेला आदर्श गौरव हा राज्यातील पहिला अभिनेता बनला आहे, ज्याच्या ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाला ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स (बाफ्टा) नंतर आता ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रमीन बहरानी आहेत.
सोमवारी (15 मार्च) जाहीर केलेल्या 93 व्या अकॅडमी अवॉर्ड नामांकनाच्या यादीमध्ये, या चित्रपटाचा समावेश अॅडॉप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरीत करण्यात आला आहे. या कॅटेगरीत ऑस्कर जिंकण्यासाठी चित्रपटाला ‘द फादर’, ‘नोमॅडलँड’ आणि ‘वन नाईट इन मियामी’ या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे. यापूर्वी चित्रपटाचा अभिनेता आदर्श गौरवला बाफ्टाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते.
ऑस्कर पुरस्कारांची घोषणा 15 एप्रिल रोजी होईल. अभिनेता आदर्श 10 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. ‘माय नेम इज खान’, ‘मॉम’, ‘रुख’ या चित्रपटांत त्याने काम केले आहे. आदर्श म्हणाला की, “मी भाग्यवान आहे की मीही या चित्रपटाचा एक भाग आहे.”
चित्रपटात बलराम हलवाईची (आदर्श गौरव) कथा सांगितली आहे, ज्याचा जन्म बरेच दारिद्र्य असलेल्या लक्ष्मणगड गावात झाला आहे. वडिलांच्या निधनानंतर बलरामला त्याचे शिक्षण सोडावे लागते. या चित्रपटात बलराम हलवाईचा दारिद्र्यातून मुक्त होण्यासाठी केलेला संघर्ष दाखवला गेला आहे.
दरम्यान, क्रूर जमीनदाराचा (महेश मांजरेकर) लहान मुलगा अशोक (राजकुमार राव) अमेरिकेतून परततो. बलराम अशोकला विनवणी करून शहरात पोहोचतो आणि त्याचा ड्रायव्हर बनतो. आता बलारामचे जग स्वतंत्र विचारसरणी असलेल्या अशोक आणि त्याची पत्नी पिंकीच्या (प्रियंका चोप्रा) भोवती आहे. श्रीमंत-गरिबी यांच्यातील दुरावा कमी होतच असतो की, दिल्लीत एक दुर्घटना घडते. त्या बरोबरच जन्म होतो तो ‘व्हाईट टायगर’चा.
अॅडॉप्टेड स्क्रीनप्ले म्हणजे, आधीपासूनच उपलब्ध कथेवर आधारित चित्रपट. म्हणजेच त्याची स्क्रिप्ट खरी नसते. असा चित्रपट कादंबरी, पुस्तक, मालिका इत्यादींवर आधारित असतो. ‘द व्हाइट टायगर’ हा एक कादंबरी आधारित चित्रपट आहे, म्हणून याचे अॅडॉप्टेड स्क्रीनप्लेच्या कॅटेगरीत नाव दिले गेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर
-अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार
-अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय










