चित्रपटगृह सुरू झाले तशी नवनव्या चित्रपटांच्या घोषणांची मालिकाच लागली. अनेक वेगवेगळ्या नवीन जोड्यांचे, कलाकारांचे सिनेमे जाहीर झाले आहेत. यातच आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. एका हिट जोडीला पुन्हा एकदा वेगळ्या चित्रपटातून बघण्याची संधी मिळणार आहे. ही जोडी आहे, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर. २०२० मध्ये ‘रूही’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही जोडी आता पुन्हा प्रेक्षकांना ‘माही’ या सिनेमातून दिसणार आहे. नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा करत, करण जोहरने चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले. या नवीन चित्रपटाचे नाव आहे ‘मिस्टर एंड मिसेज माही.’ या सिनेमाचे पोस्टर आणि एक छोटासा व्हिडिओ इंस्टाग्रामवर करण जोहरने शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. करणसोबतच जान्हवी आणि राजकुमारने देखील या सिनेमाची फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फर्स्ट लूकमधून राजकुमार आणि जान्हवी यांच्या पात्रांची नावे देखील सांगितली आहे. यात राजकुमार रावचे नाव ‘महेंद्र’ आणि जान्हवीचे नाव ‘महिमा’ असे आहे. फर्स्ट लूकवरून हा सिनेमा क्रिकेटशी संबंधित असल्याचे समजत आहे. हळूहळू या सिनेमाची अधिक माहिती समोर येईलच.
‘माही’ सिनेमाचे नाव ऐकून अनेक लोकं या सिनेमाला महेंद्रसिंग धोनीसोबत देखील जोडत आहे. तशा कमेंट्सही सोशल मीडियावर येत आहेत. मात्र आता हा सिनेमा नक्की कसा असेल कसा हे ७ ऑक्टोबर २०२२ लाच समजेल. या सिनेमाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. शरण यांनी याआधी जान्हवीच्या ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या फर्स्ट लूकबद्दल बोलायचे झाल्यास यात कोणाचाही लूक दाखवला गेला नसला तरी ऐकू येणारा आवाज हा राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा आहे. यासोबतच काही संवाद ऐकू येत आहेत. ‘कधी कधी एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन लोकांची गरज असते.’ यानंतर क्रिकेटची कमेंटरी चालू होते आणि शेवटी पुन्हा एक संवाद ऐकू येतो, ‘कदाचित इंडियाला एक नवीन स्टार मिळाला.’ ‘रूही’ सिनेमांनंतर ही जोडी मोठ्या पडद्यावर किती धमाल करते हे २०२२ मध्ये आपल्याला समजेलच.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती
-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा
-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…