Sunday, February 23, 2025
Home अन्य जान्हवी कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील घालणार धुमाकूळ, ज्युनिअर एनटीआरसोबत साऊथमध्ये करणार एंट्री

जान्हवी कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील घालणार धुमाकूळ, ज्युनिअर एनटीआरसोबत साऊथमध्ये करणार एंट्री

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (shreedevi) यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi kapoor) कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अशातच अशी माहिती हाती आली आहे की, जान्हवी लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती ज्युनियर एनटीआर दिग्दर्शित बुची बाबूसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटात काम करणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या पुढील चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु साउथ सुपरस्टारच्या चित्रपटाबाबत चर्चा नक्कीच सुरू झाली आहे. अशी चर्चा आहे की, ज्युनियर एनटीआरची नायिका बॉलिवूडची ‘धडक गर्ल’ म्हणजेच जान्हवी कपूर असेल. माध्यमातील वृत्तानुसार, ज्युनियर एनटीआर आणखी एका पॅन इंडिया चित्रपटाची तयारी करत आहे.

‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीची त्याची लोकप्रियता पाहून साऊथ सुपरस्टारने आणखी एक मोठा पॅन इंडिया चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री हवी आहे. निर्मात्यांना जान्हवी कपूरला ज्युनियर एनटीआरच्या नवीन चित्रपटात कास्ट करायचे आहे. चित्रपटाच्या संकल्पनेनुसार निर्माते जान्हवी कपूरला फिट मानत आहेत. परंतु यावर जान्हवी कपूरने या चित्रपटासाठी होकार दिला आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ज्युनियर एनटीआरला ‘आरआरआर’च्या यशाबद्दल आत्मविश्वास आहे, म्हणूनच त्याने पुढील चित्रपटाची तयारी देखील सुरू केली आहे. जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी कपूरने अलीकडेच मिली नावाच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीकडे ‘दोस्ताना २’, ‘गुड लक जेरी’, ‘मिस्टर आणि मिसेस’ यांसारखे चित्रपट आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा