Friday, April 19, 2024

अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत सुपरहिट चित्रपट देणाऱ्या मौसमी चॅटर्जी यांचे एका घटनेने बदलून दिले आयुष्य

बॉलिवूडमध्ये ७०/८० च्या दशकात अनेक प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींनी एन्ट्री करत त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरवली. आजही त्या अभिनेत्री, त्यांचे काम, त्यांची सुंदरता नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. याच यादीतील एक मुख्य अभिनेत्री म्हणजे मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) मौसमी या नेहमीच लोकप्रियतेच्या बाबतीत टॉपवर होत्या. या बंगाली ब्युटीने संपूर्ण बॉलिवूडवर जादू करत सर्वाना त्यांचे फॅन बनवून घेतले. त्यांच्या काळातील सर्वच सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केलेल्या मौसमी या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूपच चर्चेत आल्या. मौसमी यांचा जन्म २६ एप्रिल १९४८ रोजी बंगालच्या कोलकात्यामध्ये झाला. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्यांनी त्यांचे शिक्षण देखील पूर्ण केले. १९६७ साली मौसमी यांनी बांगलाई सिनेमा असलेल्या ‘बालिका वधू’ मधून चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/People & History

या चित्रपटानंतर मौसमी यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सचा अक्षरशः पूर आला होता. मात्र त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. पण म्हणतात ना जे नशिबात असते तेच घडते मौसमी यांच्या बाबतीतही असेच घडले. त्या दहावीत असताना तात्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला त्यांना वधू म्हणून बघायचे होते, ही त्यांची शेवटची इच्छा होती. यासाठी त्यांचे हेमंत कुमार यांच्या मुलाशी जयंत मुखर्जी (Jayant Mukherjee) शी लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. परिणीता, अनिंदिता, अनुराग, दो प्रेमी, अंगूर, मंजिल, रोटी कपड़ा और मकान, स्वयंवर, सबसे बड़ा रुपैया आदी हिट चित्रपट करत त्यांची त्यांची ओळख निर्माण केली.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/People & History

त्यांची जोडी सर्वाधिक राजेश खन्ना (Rajesh Khanna), विनोद खन्ना (Vinod Khanna) संजीव कुमार (Sanjeev Kumar) आदी कलाकारांसोबत खूप रंगली आणि गाजली देखील. मीडियामधील माहितीनुसार मौसमी या इतक्या भावनिक होत्या, की त्या चित्रपटांमधील भावनिक आणि रडण्याचे सीन ग्लिसरीनचा वापर न करता सहज करायच्या.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/People & History

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे लग्न जयंत यांच्याशी झाल्यानंतर त्यांना पायल आणि मेघा या दोन मुली झाल्या. मात्र काही वर्षांनी त्यांच्या पायल या मुलीचे खूपच कमी वयात एका आजाराने निधन झाले. या घटनेनंतर त्या संपूर्णपणे कोलमडल्या आणि याचा मोठा धक्का त्यांना बसला. त्या मधल्या काळात दीपिका आणि अमिताभ यांच्या पिकू सिनेमात देखील दिसल्या होत्या.

हेही वाचा-

हे देखील वाचा