Saturday, July 6, 2024

‘अगदी अस्साच नवरा हवा…’, जान्हवी कपूरने केलीय लग्नाची पूर्ण तयारी; होणाऱ्या पतीबद्दलही बोलली असं काही

जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमध्ये आपले करिअर सेट करण्यात व्यस्त आहे. जान्हवीने आतापर्यंत ४ चित्रपट केले आहेत आणि ती प्रत्येक चित्रपटासह एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनत चालली आहे. पण यासोबतच जान्हवीने तिच्या लग्नासाठीचाही पूर्ण प्लॅन तयार ठेवला आहे. होय, अलीकडेच जान्हवीने तिच्या लग्नाचा संपूर्ण प्लॅन सांगितला आहे. जान्हवीने बॅचलर पार्टीपासून ते लग्नापर्यंतची संपूर्ण तयारी केली आहे. जान्हवी म्हणते की, तिला एक साधे आणि सुंदर लग्न हवे आहे, जे अवघ्या २ दिवसात होईल.

जान्हवीने पिकॉक मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला तिची बॅचलर पार्टी कॅप्रीमधील याचमध्ये आणि लग्न तिरुपतीमध्ये करण्याची इच्छा आहे. तिला तिचा मेहंदी आणि संगीत सोहळा मयलापूरमध्ये करायचा आहे. जान्हवीने असेही म्हटले, की तिला रिसेप्शनबद्दल कोणताही उत्साह नाही. जान्हवी म्हणाली, “रिसेप्शन आवश्यक आहे का? नाही ना, मग सोडा रिसेप्शन.”

लग्नाच्या डेकोरेशनबाबत जान्हवी म्हणाली, “लग्नाचे डेकोरेशन पारंपारिक पण साधे असेल. मोगरा आणि मेणबत्त्या लावून डेकोरेशन झालं पाहिजे.” (janhvi kapoor share her wedding plan reveal how her future husband should be)

जेव्हा जान्हवीला विचारण्यात आले की, तिची ब्राइड्समेड कोण असेल? तेव्हा तिने खुशी कपूर आणि अंशुला कपूर यांची नावे घेतली. यासोबत तिने तिची मैत्रीण तनिशाचे नावही घेतले. जान्हवी म्हणाली, “जर माझ्या लग्नात खुशी आणि पप्पा भावनिक झाले, तर अंशुला दीदी सर्वकाही सांभाळून घेईल.”

असे असेल वेडिंग आऊटफिट
तिच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल जान्हवी म्हणाली, “मी कांजीवरम किंवा पट्टू पावडाई साडी परिधान करेन आणि ती सोन्याची असेल. मेहंदीचा पोशाख गुलाबी रंगाचा आणि संगीताचा पोशाख पिवळ्या रंगाचा असेल.”

होणाऱ्या पतीबद्दल काय म्हणाली जान्हवी
जान्हवी म्हणाली, “माझा पती समजुतदार असावा, कारण मी आजपर्यंत अशा कोणत्याही व्यक्तीला भेटले नाही.” जान्हवीच्या या गोष्टी ऐकून लक्षात येते की, तिने तिच्या लग्नाची सर्व तयारी केली आहे आणि आता मुलगा मिळणे बाकी आहे.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१८ मध्ये ‘धडक’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि त्यानंतर तिने ‘घोस्ट स्टोरीज’, ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘रुही’मध्ये काम केले आहे. आगामी काळात जान्हवी ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा