Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड पुन्हा एकदा ईशा गुप्ताने तिच्या बोल्ड फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

पुन्हा एकदा ईशा गुप्ताने तिच्या बोल्ड फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या चित्रपटांमुळे कमी आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे अधिक ओळखल्या जातात. सोशल मीडिया पोस्टमुळेच या अभिनेत्री खऱ्या अर्थाने लाईमलाइटमध्ये येतात. अनेक अभिनेत्रींना त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून जी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते कदाचित ती त्यांना त्यांच्या चित्रपटांमधून देखील मिळत नसेल. सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून नेहमीच बॉलिवूडच्या एका अभिनेत्रींचे नाव प्रकर्षाने घेतले जाते आणि ती अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. जन्नत २ फेम ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत लोकांचे लक्ष वेधून घेत असते.

ईशाची सोशल मीडिया पोस्ट म्हणजे नक्कीच बोल्ड फोटो असणार हे सर्वांनाच माहित झाले आहे. तिच्या ईशा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता सुद्धा ईशा पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि मादक फोटोंमुळे प्रकाशझोतात आली आहे. ईशाने नाताळच्या सेलिब्रेशननंतर तिचे काही आकर्षक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ईशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका अंधाऱ्या रूममध्ये बसलेली दिसत असून, फोटोशूट करत आहे.

ईशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका काऊचवर बसलेली दिसत असून, तिने लेदरचा काळ्या रंगाचा छोटा मादक ड्रेस घातला आहे. यासोबतच तिने काळ्या रंगाचे शूज आणि डार्क आय मेकअप केला असून, केस मोकळे सोडलेले दिसत आहे. या लूकमध्ये ईशा कमालीची सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. तिचा कॉन्फिडन्स तिच्या या लुकला एक वेगळीच सुंदरता देत आहे. याशिवाय ईशाने नाताळच्या सेलिब्रेशनचे देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात ती तिच्या कथित बॉयफ्रेंड मॅन्युअल कंपॉस ग्वालर (Manuel Campos Guallar) सोबत दिसत असून, दोघेही खूप खुश दिसत आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची सैलसर पॅंट आणि लाल रंगाचे स्वेटर घातले असून मॅन्युअल कंपॉस ग्वालर करड्या रंगाच्या स्वेटर आणि जीन्समध्ये दिसत आहे.

ईशाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, ती लवकरच बॉबी देओलच्या सुपरहिट आश्रम सिरीजच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. यात ती बॉबी देओलच्या भक्ताची भूमिका साकारेल. ईशाने २०१२ साली ‘जन्नत 2’ सिनेमातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती त्यानंतर ती ‘राज 3 डी’, ‘चक्रव्यूह’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘हमशक्ल’, ‘बेबी’, ‘मैं रहूं या ना रहूं’, ‘रुस्तम’, ‘कमांडो 2’, ‘बादशाहों’, ‘पलटन’, ‘टोटल धमाल’ आदी चित्रपटांमध्ये दिसली.

हेही वाचा :

हे देखील वाचा