Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड लिप इंजेक्टड बदल चाहत्यांमध्ये संभ्रम; जास्मिन भसीनने सोशल मीडियावर अफवांना दिला पूर्णविराम

लिप इंजेक्टड बदल चाहत्यांमध्ये संभ्रम; जास्मिन भसीनने सोशल मीडियावर अफवांना दिला पूर्णविराम

टेलिव्हिजनमधील अभिनेत्री जॅस्मिन भसीन (Jasmin bhasin) सध्या एका चाहत्याच्या कमेंटमुळे चर्चेत आहे. तिनं त्या कमेंटला किती मजेदार पद्धतीने उत्तर दिलं आहे ! टीव्ही इंडस्ट्रीमधील सगळ्यांना आवडणारी अभिनेत्री जॅस्मिन भसीन परत एकदा चर्चेत आली आहे. बिग बॉस सीझन १४ मध्ये तिच्या गोडपणामुळे, प्रामाणिकपणामुळे आणि थेट बोलण्याच्या स्वभावामुळे तिनं खूप चाहत्यांची मनं जिंकली होती.

या वेळी मात्र ती कुठल्या शोमुळे नाही, तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकल्यानंतर चर्चेत आली आहे. त्या व्हिडिओवर एका चाहत्याने तिला लिप इंजेक्शन केलंय का? असं विचारलं, आणि ही कमेंट लगेचच खूप व्हायरल झाली. अलीकडेच जॅस्मिनने तिच्या इंस्टाग्रामवर एक मजेशीर रील टाकली होती. या रीलमध्ये ती अमिताभ बच्चन आणि किशोर कुमार यांच्या गाण्यावर लिपसिंग करत होती, ‘बेइंतेहा हो गई इंतजार की’.

या व्हिडिओमध्ये ती खूप एन्जॉय करताना दिसत होती. चाहत्यांनी तिच्या रीलवर भरपूर प्रेम आणि कौतुक केलं. पण एका चाहत्याच्या कमेंटमुळे सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. त्या चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, “जैस्मिननं ओठांवर इंजेक्शन घेतलंय.” मग ही कमेंट लगेचच सगळीकडे व्हायरल झाली. ती कमेंट सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाली. लोकांना खरंच वाटायला लागलं की, जॅस्मिनने ओठांवर काहीतरी कॉस्मेटिक ट्रीटमेंट केली आहे. पण तिने अजिबात वेळ न दवडता त्या अफवेला मजेशीर उत्तर दिलं.

जॅस्मिनने त्या युजरला रिप्लाय करत लिहिलं, “इंजेक्शन नाही रे, तो फक्त फिल्टर आहे”. तिचं उत्तर छोटंसं होतं, पण एकदम जोरदार होतं. तिनं अगदी स्पष्ट सांगितलं की, तिने ना सर्जरी केलीय ना लिप इंजेक्शन घेतलंय. ती जेव्हढं वेगळं दिसत होती, ते फक्त इंस्टाग्रामच्या फिल्टरमुळे. ज्यामुळं चेहरा थोडा बदललेला आणि ओठ थोडे फुगलेले दिसतात. सध्या जॅस्मिन करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ या शोमध्ये झळकत आहे. हा शो प्राइम व्हिडिओवर बघायला मिळतोय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

काजोलसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीला PR का हवा? अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक कारण
‘धूम्रपान सोडणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय’, हंसल मेहता यांनी केला अनुभव शेअर

हे देखील वाचा