Sunday, March 16, 2025
Home कॅलेंडर Shaheer Sheikh | महाभारतातील ‘अर्जूनावर’ कोसळला दुःखाचा डोंगर! मायेचा, आधाराचा हात कायमचा हरपला

Shaheer Sheikh | महाभारतातील ‘अर्जूनावर’ कोसळला दुःखाचा डोंगर! मायेचा, आधाराचा हात कायमचा हरपला

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘पवित्र रिश्ता २’ फेम अभिनेता शहीर शेखवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीर शेखच्या वडिलांचे निधन झाले आहे. मागील खूप दिवसांपासून शहीरच्या वडिलांची तब्येत खराब होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शहीर शेखच्या वडिलांचे नाव शाहनवाज शेख.

त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांबरोबर आपल्या वडीलांसाठी प्रार्थना करा अशी पोस्ट शेअर केली होती. शहीरच्या वडिलांच्या निधनावर अली गोनीने दुःख व्यक्त केले आहे. अली गोनी हा ‘बिग बॉस १४’ मध्ये होता. त्या शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली होती.

शहीरच्या (shaheer sheikh) वडिलांची तब्बेत अचानक खालवली. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. कोव्हीडमुळे त्यांच्या शरीरात इन्फेकशन झाले होते. त्यांच्यावर इलाज चालू होते पण प्रकृती हाताबाहेर गेली होती. त्याचं वेळी त्यांनी आपल्या मित्रांकडे आपल्या वडीलांसाठी प्रार्थना करा विनंती केली आणि काही वेळानंतर त्याने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाची बातमी दिली. या बातमीनंतर त्याचा मित्र अली गोनीने दुःख व्यक्त केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Actor shaheer sheikh father passes away was on ventilator aly goni tweet pays condolences)

शहीरच्या वडिलांच्या निधनानंतर अली गोनीने ट्विट केले की, “इन्ना लिल्लाही वा इन्ना इलाही राजी उन… अल्लाह अंकल की आत्मा का शांति दे… तुम हौंसला रखो भाई’.

शहीरने १८ जानेवारी २०२२ ला आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या वडिलांचा फोटो शेअर करून “माझे वडील कोरोनाच्या संक्रमणामुळे आणि त्याच्या इन्फेक्शनमुळे गंभीर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा,” अशी पोस्ट शेअर केली होती. शाहीरच वडिलांवरील प्रेम दिसत आहे. अशातच त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याला खूप दुःख झाले आहे. सिनेसृष्टीतून त्याच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा