Friday, March 29, 2024

‘पुतळ्याचा विचार ठीक आहे पण…’ पीएम मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर जावेद अख्तर यांनी केला आक्षेप

कलाकारांचा सोशल मीडियाशी खूप जवळचा संबंध असतो. अनेक गोष्टींवर ते त्यांचे मत मांडत असतात. गीतकार जावेद अख्तर (javed akhtar) देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. देशात तसेच परदेशात चालणाऱ्या अनेक गोष्टींवर ते त्यांचे मत व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी ट्विटरवर सेनापती सुभाषचंद्र बोस यांचा इंडिया गेटवरील नमन करताना उभारलेल्या पुतळ्यावर त्यांचे मत मांडले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सरकारचा हा विचार ठीक आहे, परंतु पुतळ्याची निवड ठीक नाहिये. त्यांनी केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “नेताजी यांच्या पुतळ्याचा विचार तर ठीक आहे. परंतु पुतळ्याची निवड योग्य नाहीये. या पुतळ्याभोवती गर्दी राहिल आणि पुतळा नेहमी सॅल्युट करताना दिसेल. हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. एक तर तो पुतळा बसलेला पाहिजे होता नाहीतर हवेत हात फिरवून घोषणा देताना पाहिजे होता.” जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या ट्विटवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “जावेद सर, प्लीज एकदा हे देखील म्हणा की, दिवसातून पाच वेळा नमाज करण्याचा विचार देखील ठीक आहे पण लाऊड स्पीकरचा वापर करणे योग्य नाही. नमाज एक वेगळी गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणताही दंगा न करता घराच्या आता केला पाहिजे.” आणखी एकाने लिहिले की, “काँग्रेसच्या नेत्याला एवढी अडचण का आहे.” (Javed Akhtar on netaji statue at India gate says is fine but choice of statue is not right)

नेताजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी या पुतळ्याची घोषणा केली होती. त्यावर जावेद अख्तर यांनी आता त्यांचे मत मांडले आहे. काहीजण त्यांच्या या विचाराला प्रोत्साहन देत आहेत, तर काहींना मात्र त्यांचा हा विचार अजिबात आवडला नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा