×

अनुपम खेर यांच्या आईने पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देत म्हटले, “यावेळेस सुद्धा हेच निवडणूक जिंकणार”

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर नेहमीच आपल्या अभिनयाने कायम चर्चेत असतात. त्यांची लोकप्रियता ही देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका प्रभावीपणे साकारत चाहत्यांच्या मनावर आपले नाव कोरले आहे. अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच आपली आई दुलारी सोबतचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून आपल्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांची आई दुलारी पीएम नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देत म्हणतात की, या वर्षी सुद्धा हेच जिंकणार.

व्हिडिओमध्ये अनुपम खेर त्यांच्या आईला विचारतात की, “प्रजासत्ताक दिनाची परेड पाहिली का?” यावर उत्तर देताना अनुपम खेर यांची आई म्हणाली, “हो पाहिली ना, सकाळी २-३ तास.” हे ऐकताच अनुपम त्यांना विचारतात मोदीजींनी काय केले? अनुपम यांचा प्रश्न ऐकताच त्यांच्या आईने मोदींना सैल्युट करत हसत म्हटले की, “त्यांना पाहिल्यावर माहित नाही मी खूप खुश होते, मला समजत नाही आता. मला असं वाटते जसे काही तूच आहेस. आईचं हे बोलणे ऐकून अनुपम खेर म्हणतात ‘क्या बात हैं”.

अनुपम खेर त्यांच्या आईला सांगतात की, ‘ते आज टोपी घालून छान दिसत होते.’ त्यावर त्यांची आई दुलारी म्हणते की, ‘हो टोपी घालून त्यावर मफलर घातले आहे, थंडी वाजत होती ना, खूप थंडी आहे, पण मोदीजी मनाने खूप चांगले आहेत. म्हणून तर देव कायम त्यांच्यासोबत असतो. यावेळेस सुद्धा मोदीच निवडणूक जिंकून येणार आणि मी लिहून देऊ शकते. माणसाची शालीनता ही नेहमी उपयोगी ठरत असते. त्यांचा स्वभाव हा असाच असल्याने तो माणूस म्हणून चांगला आहे.

अनुपम खेर त्यावर आईला म्हणतात मग मोदींना आशीर्वाद दे. हे ऐकताच त्यांची आई दुलारी खुश होतात आणि म्हणतात की, ‘हो दिला मी आशीर्वाद त्यांना सांग माझ्या आईने आशीर्वाद पाठवला आहे तुम्हाला. २४ तास काही काळजी नाही, सुरक्षा का ठेवायची आहे तुम्हाला, तुमच्या सोबत आम्ही आहोत. सुरक्षा ठेऊ नका, मी आहे आशीर्वाद देण्यासाठी. ते खूप चांगले व्यक्ती आहे.” सोशल मीडियावर अनुपम खेर यांच्या आईचा हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला.

हा व्हिडियो शेअर करत दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी पीएम नरेंद्र मोदी याना टॅग करत लिहिलं, “आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी! मी आज माझ्या आईला प्रजासत्ताक दिवसाच्या परेड विषयी विचारलं आणि तिने तुमच्याबद्दल जे काही सांगितलं ते मी आज तुम्हाला दाखवू इच्छितो. आईचे हे शब्द मनातून बाहेर पडले असून, आईचे आणि करोडो मातांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.” अनुपम खेर यांच्या आईचा हा व्हिडिओ आतापर्यंत तीन हजार वेळा रिट्विट झाला असून, दहा हजारांपेक्षा अधिक लाईक्स व्हिडिओला आले आहेत.

हेही वाचा-

Latest Post